महाराष्ट्र

maharashtra

IND vs AUS, WTC Final 2023: ट्रॅव्हिस हेडचे खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

By

Published : Jun 8, 2023, 7:44 AM IST

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये होत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे वर्चस्व दिसले आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हेड याने शतक ठोकले आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 327 धावा केल्या आहेत.

Australian batsman Travis Head
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना इंग्लंडच्या द ओव्हलच्या मैदानावर होत आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांची दमछाक झालेली पाहायला मिळाली. पहिल्या दिवसाच्या खेळात कांगारुंनी 300 धावांचा आकडा पार करत 327 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली होती, परंतु ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी दिवसाचा शेवट गोड करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले.ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी वर्चस्व राहिले. स्मिथ-हेड या जोडीने द्विशतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.

हेड आणि स्मिथने डाव सावरला : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारचा हा निर्णय काही काळापर्यंत योग्य ठरला. पण त्यानंतर मात्र भारतीय संघाला हा निर्णय चुकल्यासारखे वाटू लागले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला तीन धक्के दिले. झटपट 3 गडी बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या स्मिथ आणि हेड यांनी टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. हेड याने आपले शतक पूर्ण केले आहे. तर स्मिथ शतकाच्या जवळ पोहोचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने 327 धावांचा टप्पा पार केला होता. तर चौथ्या विकेटसाठी फलंदाजी करणाऱ्या हेड आणि स्मिथ यांनी 251 धावांची भागिदारी केली आहे. हेड याने 156 चेंडूमध्ये 146 धावा केल्या आहेत. यात त्याने चौकाराचा पाऊस पाडला आहे. तब्बल 22 चौकार त्याने लगावले आहेत. तर एक षटकार ठोकला आहे. या दोघांच्या मदतीने हेडने 146 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर स्मिथने 227 चेंडूमध्ये 95 धावा केल्या आहेत.

अशी होती भारतीय गोलंदाजी : भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी तीन गडी झटपट बाद केले. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. उस्मान ख्वाजा याला सिराजने बाद केले. तर मोहम्मद शमी याने मार्नस लाबूशेन याला परत तंबूमध्ये पाठवले.शार्दूल ठाकूरने डेविड वॉर्नरला स्वस्तात बाद केले.

ट्रॅव्हिस हेड अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या आतापर्यंतच्या इतिहासात फायनलमध्ये एकाही खेळाडूला शतक ठोकता आले नव्हते. मात्र ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये शतक ठोकले आहे,असा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.दरम्यान भारताविरुद्ध हेडचे हे पहिले शतक आहे. ट्रॅव्हिस हेडने 2018 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय रॅकिंगमध्ये हेड तिसऱ्यास्थानी आहे. हेडने आतापर्यंत 36 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 2361 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. WTC Final 2023 : ICC प्रोमोमध्ये WTC फायनल 2023 करता स्मिथ विरुद्ध कोहलीचे पोस्टर

2. WTC Final 2023 : दोन्ही संघ संतुलित, सामना रोमांचक होणार - दिलीप वेंगसरकर

ABOUT THE AUTHOR

...view details