महाराष्ट्र

maharashtra

PAK vs SL Asia Cup Super 4 : श्रीलंकेचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय, फायनल मुकाबला भारतासोबत

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 8:53 PM IST

Updated : Sep 15, 2023, 1:40 AM IST

अटीतटीच्या सामन्यात अखेर श्रीलंकेने पाकिस्तानवर 2 विकेट राखून दणदणीत विजय मिळवलाय. आता अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. पाकिस्ताननं श्रीलंकेसमोर 252 धावांचं टार्गेट दिलं होतं मात्र श्रीलंकेनं पाकिस्तानला धूळ चारत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय.

PAK vs SL Asia Cup Super 4
PAK vs SL Asia Cup Super 4

कोलंबो :शेवट्पर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानवर 2 विकेट राखून विजय मिळवलाय. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आता आशिया कपमधून बाहेर पडावं लागतंय. आता श्रीलंकेचा अंतिम मुकाबला हा भारतासोबत होणार आहे. सुपर फोरमधला हा चौथा सामना होता. भारतानं पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करुन आधीच अंतिम फेरीत प्रवेश केलाय. टीम इंडिया 11 व्यांदा आशिया कप क्रिकेटच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे.

पाकिस्तानची दमदार खेळी : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आशिया कप 2023 सुपर 4 मधील 5 वा सामना आज कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला. आशिया चषक 2023 सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 42 षटकात 7 गडी गमावून 252 धावा केल्या. पावसामुळे सामना सुरुवातीला 45-45 षटकांचा होता, पण नंतर पावसाच्या व्यत्ययामुळं तो 42-42 षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं नाबाद 86, अब्दुल्ला शफीकनं 52 तर इफ्तिखार अहमदनं 47 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे मथिसा पाथिरानानं तीन, तर प्रमोद मदुसननं दोन गडी बाद केले.

28 व्या षटकात पावसाची हजेरी : प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. 5 व्या षटकात फखर जामाच्या रूपानं संघानं पहिली विकेट गमावली. यानंतर बाबर आणि शफिक यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. बाबर 29 धावा करून बाद झाला तर, अब्दुल्ला 52 धावा करून बाद झाला. मोहम्मद हारिस (3) आणि नवाज (12) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा संघ एकवेळ संघर्ष करताना 27.4 षटकांत 130 धावांवर 5 गडी गमावले. 28व्या षटकात पावसानं हजेरी लावली. त्यानंतर रिझवान आणि इफ्तिखार यांच्या शतकी भागीदारीमुळं पाकिस्तान संघानं उर्वरित 14.2 षटकांत दोन गडी गमावून 130 धावा केल्या.

फायनलमध्ये भारत-पाकिस्तान सामना नाही : आशिया कपमधून पाकिस्तान संघ बाहेर पडलाय. त्यामुळं पाकिस्तानचा मुकाबला आता भारतासोबत होणार नाही. आतापर्यंत एकदाही आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने आले नाहीय. यावेळेस तरी भारत पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होईल अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती.

17 सप्टेंबरला भारतासोबत अंतिम सामना :श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर-4 टप्प्यात प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. तसंच 1-1 सामना गमावला आहे. आजचा सामना श्रीलंका संघानं जिंकल्यामुळं 17 सप्टेंबर रोजी भारतासोबत अंतिम सामना होणार आहे.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन :फखर जमान, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद हारिस, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्युनियर, जमान खान

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन :पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालेज, महिश थेक्षाना, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

हेही वाचा -

  1. Gambhir on Dhoni : धोनीबाबत गौतम गंभीरचं आणखी एक मोठं वक्तव्य; म्हणाला, 'धोनीमुळे रोहित शर्मा...'
  2. Ind Vs SL : भारत आशिया चषकाच्या फायनलमध्ये, श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव
  3. Rohit Sharma Record: 'हिटमॅन'च्या वनडेत १०,००० धावा पूर्ण, सचिनचा 'हा' रेकॉर्ड मोडला
Last Updated :Sep 15, 2023, 1:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details