महाराष्ट्र

maharashtra

Kevin Pietersen statement : केविन पीटरसनकडून जोस बटलरच्या फलंदाजीचे कौतुक

By

Published : Apr 26, 2022, 9:23 PM IST

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 15 व्या हंगामात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर जोरदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सात सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली आहेत. तो या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यामुळे केविन पीटरसननेही त्याचे जोरदार कौतुक केले आहे.

Kevin Pietersen
Kevin Pietersen

पुणे:पुणे: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरच्या ( Opener Jose Butler ) आयपीएल 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीवर भाष्य करताना, इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन म्हणाला की या स्फोटक फलंदाजाचे कौतुक ( Kevin Peterson compliment ) करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. बटलर लीगमध्ये धमाकेदार फॉर्ममध्ये आहे, त्याने सात डावांमध्ये 81.83 च्या सरासरीने आणि 161.51 च्या स्ट्राइक रेटने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तीन शतकांसह 491 धावा केल्या आहेत.

स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाईव्ह शोमध्ये बोलताना पीटरसन म्हणाला, आयपीएल 2022 अशा खेळीमुळे अविश्वसनीय बनले आहे. प्रेक्षकांना त्या खेळ्या आवडतात, आम्हालाही अशा खेळी पाहायला आवडतात. म्हणजे बटलरने असे काही शॉट्स खेळले जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला आवडतील. पीटरसन म्हणाला, बटलर खूप शानदार फलंदाजी करत आहे. जेव्हा तो अशा स्फोटक पद्धतीने फलंदाजी करतो तेव्हा कधी-कधी तुम्हाला एवढेच म्हणायचे असते की त्याने आपला वेळ घेऊन शानदार खेळी खेळली.

वानखेडे स्टेडियमवर दिल्लीविरुद्धच्या राजस्थानच्या शेवटच्या सामन्यात, बटलरने पुन्हा एक उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने 65 चेंडूत 9 चौकार आणि तब्बल तितकेच षटकार मारत 116 धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला 222/2 धावापर्यंत मजल मारता आली. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मंगळवारी राजस्थानचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. पीटरसनने बटलरला या स्पर्धेत चांगली फलंदाजी करण्यासाठी पाठींबा दिला आहे.

भारताचा लेगस्पिनर पियुष चावलाने ( Legspinner Piyush Chawla ) पीटरसनने बटलरबद्दल केलेल्या टिप्पणीशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, आतापर्यंत अर्धी स्पर्धा पूर्ण झाली आहे आणि बटलरने आधीच 490 धावा केल्या आहेत. साधारणपणे लोक संपूर्ण हंगामात इतक्या धावा करतात. या मोसमात तो चांगली फलंदाजी करत आहे.

हेही वाचा -IPL 2022 RCB vs RR : नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; संजू सेना फलंदाजीसाठी सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details