ETV Bharat / sports

IPL 2022 RCB vs RR : नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; संजू सेना फलंदाजीसाठी सज्ज

author img

By

Published : Apr 26, 2022, 7:17 PM IST

आयपीएल 2022 च्या मोसमात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB vs RR ) संघात 39 वा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात होईल. तत्पुर्वी आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

RCB vs RR
RCB vs RR

पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 ) पंधराव्या हंगामातील आज 39 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला जाईल. या सामन्याला पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी या दोन संघाचे कर्णधार संजू सॅसमन आणि फाफ डुल प्लेसिस यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय ( Royal Challengers Bangalore opt to bowl ) घेतला आहे.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) सात सामने खेळले आहेत, त्यापैकी पाच सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे दहा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ( Royal Challengers Bangalore Team ) आठ सामने खेळले असून पाच विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात दहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. राजस्थानने आपल्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे, तर बंगळुरु संघाने मागील सामन्यात हैदराबाद संघाकडून परभव स्वीकारला आहे.

आरसीबी विरुद्ध आरआर यांच्यातील हेड टू हेड - राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यामधील आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत. तसेच राजस्थानने 10 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. तर एक सामना रद्द झाला. या मोसमातील पहिल्याच सामन्यात आरसीबीने बाजी मारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिशेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसीद कृष्णा आणि युझवेंद्र चहल.

हेही वाचा - Elvera Brito Passes Away : भारताच्या माजी महिला हॉकी कर्णधाराचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.