महाराष्ट्र

maharashtra

IPL 2023 : धावांची बरसात, मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय

By

Published : May 12, 2023, 7:23 PM IST

Updated : May 13, 2023, 12:08 AM IST

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात. गुजरातने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण केले. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. गुजरातला विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, गुजरातने 20 षटकांत 8 गडी गमावून 191 धावा केल्या. आणि गुजरातचा 27 धावांनी पराभव झाला. आजचा सुपर हिरो सूर्यकुमार यादवने 103 आणि रशीद खानने 79 धावा केल्या.

Mumbai Indians vs Gujarat Titans
मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

मुंबई :शुक्रवार, 12 मे 2023 रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या 57 व्या सामन्यात, गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सचा तिस-या क्रमांकाचा संघ, मुंबई इंडियन्सशी सामना झाला. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 191 धावा करता आल्या. रशीद खानने 32 चेंडूत 79 धावा केल्या, ज्यामुळे गुजरातला टायटन्सकडून झालेल्या मानहानीकारक पराभवापासून वाचवले. आणि काहीसा सन्माननीय स्कोअर झाला.

एमआयची फलंदाजी:इशान किशनने (यष्टीरक्षक) 20 चेंडूत 31 धावा केल्या. रोहित शर्माने (कर्णधार) 18 चेंडूत 29 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूंत 11 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावा (नाबाद) केल्या. नेहलने 7 चेंडूत 15 धावा, विष्णू विनोदने 20 चेंडूत 30 धावा, टीम डेव्हिडने 3 चेंडूत 5 धावा आणि ग्रीनने 3 चेंडूत 3 धावा (नाबाद) केल्या. संघाला 2 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सची एकूण धावसंख्या 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा झाली. मुंबई इंडियन्स संघाने आजचा सामना जिंकला त्यामुळे हा संघ राजस्थान रॉयल्सला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर परतला आहे.

जीटीची गोलंदाजी:शमीने 4 षटकात 53 धावा दिल्या. मोहित शर्माने 4 षटकात 43 धावा देत 1 बळी घेतला.रशीद खानने 4 षटकात 30 धावा देत 4 विकेट घेतल्या. नूर अहमदने 4 षटकांत 38 आणि अल्झारी जोसेफने 4 षटकांत 52 धावा दिल्या.

GT आणि MI कामगिरी: मुंबई इंडियन्सचा विजय लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद सारख्या संघांच्या संकटात भर घालेल. दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, गुजरात टायटन्सने आतापर्यंत 11 सामन्यांत 8 आणि 16 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघ 11 सामन्यांत एकूण 6 विजयांसह केवळ 12 गुण मिळवू शकला आहे. आजचा सामना जिंकला तर तो 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आला.

गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद ;इम्पॅक्ट प्लेअर्स -गिल, सुदर्शन, केएस भरत, शिवम मावी, आर साई किशोर

मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय ;इम्पॅक्ट प्लेअर्स -मधवाल, रमणदीप, ब्रेविस, वॉरियर, शोकीन

हार्दिक पंड्या : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक चांगली विकेट दिसते मात्र दव प्रभाव टाकू शकतो. त्यामुळे धावांचा पाठलाग करणे सोपे राहू शकते. आम्हाला प्रत्येक मॅचचे महत्त्व माहित आहे. आम्हाला फक्त आमच्या योजनांवर ठाम राहून चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे. तुमच्या चूकांतून धडा शिकणे, त्यांना दुरुस्त करणे आणि त्यांची पुनरावृत्ती न करणे महत्त्वाचे आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही हमखास चुका करता. सुदैवाने आमच्या संघात कोणी जखमी नाही. आम्ही त्याच संघासह खळतो आहे.

रोहित शर्मा : आम्हीही आधी गोलंदाजीच केली असती. आम्हाला चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची गरज आहे. गेल्या काही सामन्यांपासून गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत. आम्ही या क्षणी कुठे उभे आहोत हे आम्हाला माहित आहे. फक्त चालू मॅचवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दुखापती आमच्या दृष्टीने चांगल्या नाहीत, परंतु आम्हाला त्याचा सामना करावा लागेल. आम्ही मागील सामन्याप्रमाणे त्याच संघासह खेळत आहोत.

हेही वाचा :

  1. Yashasvi Jaiswal Records : 21 वर्षांच्या यशस्वीने एकाच सामन्यात मोडले आयपीएलमधील अनेक विक्रम, जाणून घ्या..
  2. Virat Kohli Instagram Post : राजस्थान विरुद्धच्या मॅचपूर्वी विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केला 'हा' फोटो शेअर, म्हणाला..
  3. IPL 2023 : कोणता संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी होणार ? दोन्ही संघांना संधी
Last Updated :May 13, 2023, 12:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details