महाराष्ट्र

maharashtra

'वाळू वादळा'नंतर अखेर टॉस चेन्नईने जिंकला, आरसीबी फलंदाजीसाठी सज्ज

By

Published : Sep 24, 2021, 7:50 PM IST

Updated : Sep 24, 2021, 10:58 PM IST

आरसीबी विरुध्द चेन्नई सुपर किंगच्या सामन्यात वाळूचे विघ्न

शारजाच्या मैदानावर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुध्द चेन्नई सुपर किंगचा सामना रंगतदार झाला. मात्र टॉस होण्यापूर्वीच मैदानावर वाळूचे वादळ थडकले. त्यामुळे या सामन्याचा टॉस लांबणीवर पडला होता. त्यानंतर टॉस जिंकून सीएसआरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघाने 20 षटकात 6 बाद 156 धावा बनवल्या.

दुबई - शारजाच्या मैदानावर सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात टॉस जिंकून सीएसआरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघाने 20 षटकात 6 बाद 156 धावा बनवल्या. 157 धावांचा पाठलाग चेन्नई संघ करीत आहे.

आजच्या सामन्यात सिंगापूर येथील हार्ड -हिटींग टी 20 फलंदाज टीम डेव्हिड याला रॉयल चॅलेंजर्सने संधी दिली आहे. तर नवदिप सैनीचीही सचीन बेबीच्या जागी वर्णी लागली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.

रॉयल चॅलेंज बंगळूरु संघ - विराट कोहली, देबदत्त पडीक्कल, स्रीकार भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलीएर्स, टीम टेव्हिड, वनिंदूर हसरंगा, नवदिप सैनी, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ - ऋतुराज गायकवाड, फाफ दू प्लेसीस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, जोश हेजलवुड.

वाळूच्या वादळामुळे टॉसला झाला होता विलंब

आयपील टी 20 स्पर्धा 2021ची दुसरी फेरी सध्या युएईमध्ये सुरू आहे. शारजाच्या मैदानावर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुध्द चेन्नई सुपर किंगचा सामना होणार आहे. मात्र टॉस होण्यापूर्वीच मैदानावर वाळूचे वादळ थडकले. त्यामुळे या सामन्याचा टॉस लांबणीवर पडला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ गुण तालिकेमध्ये दुसऱया स्थानावर आहे. 8 पैकी 6 सामने संघाने जिंकले असून 12 गुण त्यांच्या नावावर आहेत. त्या पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले आहेत. आजचा सामना जिंकून चेन्नई संघाच्या गुण बरोबरी करण्याची संधी बंगळूरुला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी धोनी टीम विरुध्द विराट सेना सज्ज झाली आहे. मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच हे वाळूचे विघ्न आडवे आले आहे.

हेही वाचा - Ipl 2021: कोलकात्याचा सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय

Last Updated :Sep 24, 2021, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details