महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 RR vs LSG : नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सचा गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

By

Published : Apr 10, 2022, 7:41 PM IST

लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Lucknow Super Giants vs Rajasthan Royals ) लढत होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी लखनौ सुपरजायंट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RR vs LSG
RR vs LSG

मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधाराव्या हंगामात आज (10 एप्रिल) डबल हेडर सामन्यातील दुसरा म्हणजे विसावा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Lucknow Super Giants vs Rajasthan Royals ) लढत होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घोतला आहे.

या सामन्यात केएल राहुल आणि संजू सॅमसन या युवा कर्णधारांवर आपापल्या संघाची मदार असणार आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सने तीन सामन्यांत दोन सामने जिंकले आहेत, तर लखनौ सुपरजायंट्सने आतापर्यंत चार सामन्यांपैकी तीन जिंकले आहेत.

लखनौ सुपरजायंट्सच्या संघात एविन लुईस आणि अँड्र्यू टाय यांच्या जागी मार्कस स्टॉइनिस आणि दुष्मंथा चमेरा यांचा समावेश करण्यात आला. राजस्थानच्या संघात यशस्वी जैस्वाल आणि नवदीप सैनी यांच्या जागी रुसी व्हॅन डर डुसेन आणि कुलदीप सेन यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आले आहेत.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (w/c), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि युझवेंद्र चहल.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

हेही वाचा -Ipl 2022 Rcb Vs Mi : विराट आणि रोहित शर्माला भेटणं चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ABOUT THE AUTHOR

...view details