ETV Bharat / sports

IPL 2022 RCB vs MI : विराट आणि रोहित शर्माला भेटणं चाहत्याला पडलं महागात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Apr 10, 2022, 7:24 PM IST

Updated : Apr 10, 2022, 10:30 PM IST

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या चालू सामन्यात विराट आणि रोहित शर्माला भेंटणं, एका चाहत्याला चांगलच महागात पडलं आहे. मैदानात येण्यास बंदी असताना प्रवेश करुन आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL
IPL

पिंपरी-चिंचवड (पुणे): आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अठराव्या सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore ) यांच्यात झाला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना, मैदानात येऊन त्याला आणि रोहित शर्माला भेटनं एका चाहत्याला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी चालू सामन्यात मैदानावर येणाऱ्या चाहत्याला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बेड्या ठोकण्यात आलेल्या चाहत्याचे नाव दशरथ जाधव आहे. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पुण्याच्या गहूंजे स्टेडियममध्ये घडला आहे.

सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील क्रिकेट सामने खेळवले जात आहेत. शनिवारी पुण्याच्या गहूंजे स्टेडियममध्ये आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगला होता. दरम्यान, आरसीबीचा फलंदाज विराट कोहली खेळत असताना, चालू सामन्यात तारांचं कुंपण ओलांडून त्याच्या दिशेने दशरथ धावत गेला आणि त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर तो फिल्डिंग करत असलेल्या रोहित शर्माकडे गेला. त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला रोहित शर्माने नकार दिला.

दरम्यान सुरक्षा रक्षक आणि पोलीस धावत आले, अन् दशरथला मैदानाबाहेर घेऊन गेले. हा सर्व प्रकार प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दशरथला पोलिसांनी अटक केली आली आहे. कारण मैदानावर बंदी असताना प्रवेश करुन आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचे देखील पोलीसांनी तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा - Ipl 2022 Rr Vs Lsg : डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात आज लखनौ आणि राजस्थान आमनेसामने

Last Updated : Apr 10, 2022, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.