महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 PBKS vs GT : लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबचे गुजरातला 190 धावांचे लक्ष्य

By

Published : Apr 8, 2022, 10:11 PM IST

पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्ससमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातकडून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 189 धावा केल्या आहेत.

Liam Livingstone
Liam Livingstone

मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज संघात ( Gujarat Titans vs Punjab Kings ) खेळला जात आहे. हा सामना डी. वाय पाटील स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर 9 बाद 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गुजरात संघाला 190 धावांचे लक्ष्य दिले आहे.

गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) प्रथम फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल दुसऱ्याच षटकांत (5) तंबूत परतला. त्यानंतर दुसरा धक्का जॉनी बेअरस्टोच्या (8) रुपाने बसला. तेव्हा संघाची धावसंख्या 4.5 षटकांत 34/2 अशी होती. त्यानंतर मात्र शिखर धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोनने संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु त्यानंतर शिखर धवन 35 धावांवर बाद झाला.

दरम्यान त्यानंतर एका बाजूने सातत्याने विकेट्स पडतच राहिल्या. परंतु लियाम लिव्हिंगस्टोनने ( Liam Livingstone ) एका बाजून संघाची सूत्रे आपल्या हाती घेताना वादळी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 27 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 4 षटकार लगावत 64 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्यामुळे पंजाब संघाने दीडशे धावांचा टप्पा पार करताना निर्धारित 20 षटकांत 9 बाद 189 धावा केल्या. गुजरात संघाकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा -तायक्वांदो चॅम्पियन आफरीनने केला काश्मीरचा गौरव

ABOUT THE AUTHOR

...view details