महाराष्ट्र

maharashtra

संतप्त शोएब म्हणाला, ''न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली''

By

Published : Sep 17, 2021, 10:24 PM IST

न्यूझिलंडचा संघ तीन आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांच्या शृंखलेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार होता. मात्र न्यूझीलंडने रावलपिंडी येथे होणाऱ्या पहिल्या वनडेआधीच संपूर्ण दौरा रद्द केला. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. शोएब अख्तरने न्यूझीलंडवर पाकिस्तानी क्रिकेटला मारल्याचा आरोप केला आहे.

शोएब अख्तर
शोएब अख्तर

हैदराबाद- पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी एक अशी बातमी पुढे आली की ज्यामुळे पाकिस्तानी जनता, क्रिकेट शोकिन यांना धक्का बसला आहे. न्यूझिलंडचा संघ तीन आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांच्या शृंखलेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार होता. मात्र न्यूझीलंडने रावलपिंडी येथे होणाऱ्या पहिल्या वनडेआधीच संपूर्ण दौरा रद्द केला.

दौरा रद्द करण्याचे कारण कोरोना विषाणू नाही तर पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे कारण देत हा दौरा रद्द करण्यात आलाय. न्यूझीलंड सरकारने आपल्या क्रिकेट संघाला तात्काळ पाकिस्तानातून परतण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर संपूर्ण दौरा रद्द करावा लागला.

न्यूझीलंडच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही हैराण झाले आहेत. शोएब अख्तरने न्यूझीलंडवर पाकिस्तानी क्रिकेटला मारल्याचा आरोप केला आहे. शोएब अख्तरने ट्विट करून लिहिले, न्यूझीलंडने पाकिस्तानी क्रिकेटची हत्या केली आहे.

सरकारच्या इशाऱ्यानंतर न्यूझीलंड संघाने हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, न्यूझीलंडच्या सुरक्षा एजन्सीच्या सतर्कतेनंतर, न्यूझीलंड क्रिकेट संघाला हॉटेलमधून स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. काही काळानंतर हा दौरा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. न्यूझीलंड संघाला तातडीने मायदेशी बोलावण्यात आले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्वतः न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी बोलले, पण खेळाडूच्या सुरक्षेच्या दृष्टीने न्यूझिलंड सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

हेही वाचा - न्यूझिलंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही सुरू केला दौऱ्याचा फेरविचार

ABOUT THE AUTHOR

...view details