महाराष्ट्र

maharashtra

Shubman Gill Double Century : शुभमन गिल वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा 5वा भारतीय, अनेक विक्रमांना गवसणी

By

Published : Jan 19, 2023, 7:08 AM IST

IND Vs NZ ODI
भारत विरुद्ध न्यूझीलंड

2018 च्या अंडर-19 विश्वचषकात आपली प्रतिभा दाखविल्यापासून भारतीय क्रिकेटमधला पुढचा मोठा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

हैदराबाद : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. गिलने या सामन्यात शानदार द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल हा 5वा भारतीय ठरला आहे. गिलने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 19 चौकार आणि 9 षटकार मारले.

भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा : उजव्या हाताचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या चालू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात सर्वात जलद 1000 एकदिवसीय धावा करणारा भारतीय ठरला आहे. 23 वर्षीय गिलने 19व्या वनडे डावात 1000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी भारताकडून विराट कोहली आणि शिखर धवन यांनी 24-24 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. पाकिस्तानचा फखर जमाननंतर सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल हा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने 18 एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे.

गिल दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज :23 वर्षे 132 दिवस शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड, 2023 ; 24 वर्षे 145 दिवस इशान किशन विरुद्ध बांगलादेश, चटगाव, 2022 ; 26 वर्षे 186 दिवस रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, बेंगळुरू, 2013. 2018 च्या अंडर-19 विश्वचषकात आपली प्रतिभा दाखविल्यापासून भारतीय क्रिकेटमधला पुढचा मोठा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिलने खेळीत 19 चौकार आणि नऊ षटकार मारले, त्यापैकी सहा त्याच्या 150 धावांनंतर आले. दुहेरी शतक हे त्याचे दुसरे शतक होते.

वनडेमध्ये द्विशतक झळकावणारे भारतीय

एकदिवसीय सामन्यांच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 10 फलंदाज :रोहित शर्मा 265 धावा विरुद्ध श्रीलंका, 2014 ; मार्टिन गुप्टिल 237* धावा विरुद्ध वेस्ट इंडीज, 2015 ; वीरेंद्र सेहवाग 219 धावा विरुद्ध वेस्ट इंडिज, 2011 ; ख्रिस गेल 215 धावा विरुद्ध झिम्बाब्वे, 2015 ; फखर जमान 210* धावा विरुद्ध झिम्बाब्वे, 2018 ; इशान किशन 210 विरुद्ध बांगलादेश, 2022 ; रोहित शर्मा 209 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2013 ; रोहित शर्मा 208* धावा विरुद्ध श्रीलंका, 2017 ; शुभमन गिल 208 वि न्यूझीलंड, 2023 ; सचिन तेंडुलकर 200* धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2010

हेही वाचा :Shubman Gill Double Ton: भारताची पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर मात; शुभमन गिलने दुहेरी शतक करत रचला इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details