महाराष्ट्र

maharashtra

'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती

By

Published : Dec 12, 2019, 4:23 AM IST

एकीकडे पानिपत, तान्हाजी मालुसरे आणि शाहिस्तेखानावर केलेला सर्जिकल स्राईक पाहिल्यानंतर सगळ्यांचं लक्ष गेलयं ते इतिहासातील न उलगडल्या गेलेल्या पानाकडे. गेल्या दोन दिवसात बाजीप्रभू देशपांडे यांच्या लढ्याचे चित्र मांडणारे २ सिनेमे आणि एका वेब सिरीजची घोषणा करण्यात आली आहे.

Bajiprabhu Deshpande in Marathi
'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती


मुंबई- बाजीप्रभू देशपांडे यांची अतुलनीय शौर्यगाथा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळची आहे. सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमाची एकच लाट आलेली असताना या विषयाची भुरळ निर्माते आणि दिग्दर्शक यांना पडली नसती तरच नवल होतं. त्यामुळेच एकीकडे पानिपत, तान्हाजी मालुसरे आणि शाहिस्तेखानावर केलेला सर्जिकल स्राईक पाहिल्यानंतर सगळ्यांचं लक्ष गेलयं ते इतिहासातील न उलगडल्या गेलेल्या पानाकडे. गेल्या दोन दिवसात बाजीप्रभू देशपांडे यांच्या लढ्याचे चित्र मांडणारे २ सिनेमे आणि एका वेब सिरीजची घोषणा करण्यात आली आहे.

यातील पहिला सिनेमा आहे, डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाचा दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा पावनखिंड. काल त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या विषयावर आधारित सिनेमाचं पोस्टर रिलीज करून त्याची घोषणा केली. दिवाळी २०२० मध्ये हा सिनेमा आपण घेऊन येत असल्याचे त्यांनी या पोस्टरद्वारे जाहीर केले आहे. मात्र या पोस्टमध्ये बाजीप्रभूंची भूमिका नक्की कोण करणार, याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

दरम्यान, 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' यासारख्या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या दिगपाल लांजेकर यांनीही आज त्यांच्या 'जंगजौहर' या सिनेमाचं पहिलं पोस्टर तडकाफडकी रिलीज केलं आहे. खर तर दिगपाल यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पाच सिनेमाची मालिका तयार करण्याचं शिवधनुष्य हातात घेतलं आहे. त्या श्रुंखलेतील तिसरा सिनेमा 'जंगजौहर' हा पावनखिंडित झालेल्या लढाईवर आधारित आहे. या सिनेमाचं पहिलं टीजर त्यांनी फत्तेशीकस्त सिनेमाच्या सोबत रिलीज केलं होतं. पण तरी नावावरून सिनेमाचा विषय कळला नाही आणि पर्यायी एकाच विषयावरचे 2 सिनेमे घोषित करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक जाहिरात सगळ्याच लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे पावनखिंड या वेबसिरीजसाठी ऑडिशनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेब सिरीजसाठी नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार असून त्यासाठी तरुण आणि तरुणींना आपले फोटो पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही ही वेब सिरीज नक्की कोण बनवत आहे आणि ती कोणत्या ओटिटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे, याबाबत या जाहिरातीत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

'बाजीप्रभू देशपांडे'वर मराठीत येणार ३ कलाकृती

अशात एकाच विषयावर तीन कलाकृती बनणार असल्याने नक्की सगळ्यात आधी कोणती कलाकृती तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता आहे. मात्र, अद्याप एकाही कलाकृतीच्या शूटिंगला सुरुवात झाली नसल्याने गरज पडल्यास माघार घेऊन विषय बदलण्याची मुभा आताच राहील. मात्र, नक्की यातील कोणता दिग्दर्शक माघार घेणार? की तीन तीन भगतसिंगावरील सिनेमांप्रमाणेच तीन तीन बाजीप्रभू देशपांडेवरील कलाकृती पहाव्या लागणार, ते येत्या काही दिवसात कळेलच.

Intro:बाजीप्रभू देशपांडे यांची अतुलनीय शौर्यगाथा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाच्या जवळची आहे. सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत ऐतिहासिक सिनेमाची एकच लाट आलेली असताना या विषयाची भुरळ निर्माते आणि दिग्दर्शक यांना पडली नसती तरच नवल होत. त्यामुळेच एकीकडे पानिपत, तान्हाजी मालुसरे आणि शाहिस्तेखानावर केलेला सर्जिकल स्राईक पाहिल्यानंतर सगळ्याच लक्ष गेलय ते इतिहासातील न उलगडल्या गेलेल्या पानाकडे..गेल्या दोन दिवसात बाजीप्रभू देशपांडे यांच्या लढ्याचे चित्र मांडणारे 2 सिनेमे आणि एका वेब सिरीजची घोषणा करण्यात आली आहे.

यातील पहिला सिनेमा आहे ..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमाचा दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचा पावनखिंड, काल त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरन या विषयावर आधारित सिनेमाच पोस्टर रिलीज करून त्याची घोषणा केली. दिवाळी 2020 मध्ये हा सिनेमा आपण घेऊन येत असल्याचे त्यांनी या पोस्टरद्वारे जाहीर केलं आहे. मात्र या पोस्टमध्ये बाजीप्रभूंची भूमिका नक्की कोण करणार याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

तसच फर्जंद आणि फत्तेशीकस्त यासारख्या ऐतिहासिक सिनेमाच दिग्दर्शन केलेल्या दिगपाल लांजेकर यांनीही आज त्यांच्या 'जंगजौहर' या सिनेमाचं पहिलं वहिल पोस्टर तडकाफडकी रिलीज केलं आहे. खर तर दिगपाल यांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पाच सिनेमाची मालिका तयार करण्याचं शिवधनुष्य हातात घेतलं आहे. त्या श्रुखलेतील तिसरा सिनेमा 'जंगजौहर' हा पावनखिडित झालेल्या लढाईवर आधारित आहे. या सिनेमाचं पहिलं टीजर त्यांनी फत्तेशीकस्त सिनेमाच्या सोबत रिलीज केलं होतं.पण तरी नावावरून सिनेमाचा विषय कळला नाही आणि पर्यायी एकाच विषयावरचे 2 सिनेमे घोषित करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर साध्यया एक जाहिरात सगळ्याच लक्ष वेधून घेत आहे. आणि ती म्हणजे पावनखिंड या वेबसिरीज साठी ओडिशनच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या वेब सिरीजसाठी नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार असून त्यासाठी तरुण आणि तरुणींना आपले फोटो पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. अस असलं तरीही ही वेब सिरीज नक्की कोण बनवत आहे आणि ती कोणत्या ओटिटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे याबाबत या जाहिरातीत काहीही सांगण्यात आलेलं नाही.

अशात एकाच विषयावर तीन कलाकृती बनणार असल्याने नक्की सगळ्यात आधी कोणती कलाकृती तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता आहे. मात्र आद्यप एकाही कलाकृतीच्या शूटिंगला सुरुवात झाली नसल्याने गरज पडल्यास माघार घेऊन विषय बदलण्याची मुभा आताच राहील. मात्र नक्की यातील कोणता दिग्दर्शक माघार घेणार का तीन तीन भगतसिंगावरील सिनेमप्रमाणेच तीन तीन बाजीप्रभू देशपांडेवरील कलाकृती पहावया लागणार ते येत्या काही दिवसात कळेलच.. Body:.Conclusion:.

ABOUT THE AUTHOR

...view details