महाराष्ट्र

maharashtra

Mahatma Gandhi Statue Vandalised : अमेरिकेत महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची तोडफोड

By

Published : Feb 6, 2022, 9:17 AM IST

Mahatma Gandhi
Mahatma Gandhi

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात ( Mahatma Gandhi Statue Vandalised ) आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन मध्ये हा कांस्यचा पुतळा आहे. भारताच्या वाणीज्य दुतावासाने ( Indian Embassy America ) याप्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला केलं आहे.

न्यूयॉर्क :अमेरिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समजाकंटकांनी तोडफोड केली ( Mahatma Gandhi Statue Vandalised )आहे. या घटनेवर अमेरिकास्थित भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. तर, भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबाबत तीव्र शब्दांत निषेध ( Indian Embassy America ) नोंदवला आहे.

अमेरिकेतीय न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन मध्ये महात्मा गांधी यांच्या कांस्यचा पुतळ्याची समाजकंटकांनी तोडफोड केली. भारताच्या वाणीज्य दुतावासाने म्हटले की, या प्रकरणी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी या घृणास्पद कृत्यासाठी जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अमेरिकेतील भारतीय समुदायाची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी भ्याड कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.

1986 साली केली होती स्थापना

गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनने गांधीजींची ही आठ फुटांची प्रतिमा दान दिली होती. महात्मा गांधी यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर १९८६ या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. 2001 साली हा पुतळा हटवण्यात आला होता. मात्र, 2002 मध्ये त्याची पुनर्रस्थापना केली होती. दरम्यान, मागील वर्षी सुद्धा काही अज्ञात समाजकंटकांनी कॅलिफोर्निया राज्यात गांधीजींच्या पुतळ्याची विंटबना केली होती.

हेही वाचा -U19 World Cup जिंकणाऱ्या टीम यंगिस्तानसाठी जय शाहंची 'मोठी' घोषणा, खेळाडूला मिळणार...

ABOUT THE AUTHOR

...view details