महाराष्ट्र

maharashtra

73व्या संयुक्त राष्ट्र महासभेत भारत अधोरेखीत करणार 'बहुपक्षीयते'वरचा विश्वास

By

Published : Sep 21, 2019, 7:39 PM IST

अमेरिका दौऱ्यादरम्यान, 23-24 सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी अजेंडा 2030 ची अंमलबजावणी करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित करतील. 74 व्या यूएनजीएत आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी योग्य नेतृत्व देणे ही भारतासाठी एकप्रकारची परीक्षा ठरणार आहे. तेही अशा वेळेत जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांसाठी स्वत:चे सार्वभौमत्व टिकवून ठेवणे हे एक आव्हान बनले आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वर्षांनंतर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत (यूएनजीए) सहभागी होणार आहेत. अजेंडा 2030 ला केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रीय स्तरावरील विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता आहे. अमेरीका दौऱ्यादरम्यान, 23-24 सप्टेंबरला न्यूयॉर्कमधील कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी अजेंडा 2030 ची अंमलबजावणी करण्यासाठी भारताच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित करतील. या कार्यक्रमांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची हवामान विषयक परिषद, जागतिक आरोग्य विषयक उच्चस्तरीय बैठक, शाश्वत विकास लक्ष्य परिषद, राजकीय संवाद तसेच 24 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा समावेश आहे.

हेही वाचा -खलिस्तानी, बनावट काश्मीरी गट 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या तयारीत

अजेंडा 2030 च्या प्रस्तावामध्ये जागतिक नेत्यांनी असे ठामपणे सांगितले होते की, “शाश्वत विकासाशिवाय शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही आणि शांततेशिवाय शाश्वत विकास होऊ शकत नाही” यूएनजीए येथे जागतिक नेत्यांशी संवाद साधताना मोदी, हे उद्दीष्ट सुनिश्चित करण्यासाठी बहुपक्षीय सुधारणांवर भारत लक्ष केंद्रित करेल, अशी शाश्वती देऊ शकतात.

हेही वाचा -'हाऊडी मोदी'...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानला ताकीद

74 व्या यूएनजीएत आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी योग्य नेतृत्व देणे ही भारतासाठी एकप्रकारची परिक्षा ठरणार आहे. तेही अशा वेळेत जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांसाठी स्वत:चे सार्वभौमत्व टिकवून ठेवणे हे एक आव्हान बनले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचने “बहुपक्षीयतेवरील विश्वासाची” पुष्टी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 14 जून 2019 रोजी एक ठराव मंजूर केला. हीच थीम 21 सप्टेंबर 2020 रोजी यूएनच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिखर परिषदेत समाविष्ट केली जाईल. शांतता, सुरक्षा आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून मोदींनी 27 सप्टेंबर 2019 यूएनजीएला संबोधीत केल्यास या प्रक्रीयेत भारताला पुढाकार मिळेल.

- ओशोक मुखर्जी, माजी स्थायी प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्र

Intro:Body:Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details