महाराष्ट्र

maharashtra

सलमान खान स्टारर 'टायगर 3'नं जगभरात 400 कोटीचा टप्पा केला पार

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 5:27 PM IST

Box Office Collection day 9 : सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर 'टायगर 3' नं रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटानं जगभरात जबरदस्त कलेक्शन केलंय.

Box Office Collection day 9
बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9

मुंबई - Box Office Collection day 9: 'टायगर 3' रिलीज होऊन सोमवारी 9 दिवस झालेत. चित्रपटाची क्रेझ इतकी आहे, की चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची खूप गर्दी पाहिला मिळत आहे. या वीकेंडला या चित्रपटानं जबरदस्त कलेक्शन केले होते, तर दुसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जादू चालवताना दिसत आहे. 'टायगर 3' चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये आहे. या चित्रपटानं जगभरात आपले बजेटचं टारगेट ओलांडलंय. 'टायगर 3' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रसारित होईल. दरम्यान 'टायगर 3'नं 9व्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया.

'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 44.5 कोटीची कमाई केली. यानंतर दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, सातव्या दिवशी 18.5 कोटी, आठव्या दिवशी रविवारी 10.25 कोटीची कमाई केली. तर नव्या दिवशी या चित्रपटानं 7.35 कोटीचा गल्ला जमवला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 237.25 कोटी झाले आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ' टायगर 3' चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे जबरदस्त अ‍ॅक्शन कॅमिओ केला आहे.

' टायगर 3' देशांतर्गत कलेक्शन

पहिला दिवस- 44.5 कोटी

दुसरा दिवस – 59.25 कोटी

तिसरा दिवस- 44.3 कोटी

चौथा दिवस - 21.1 कोटी

पाचवा दिवस - 18.5 कोटी

सहावा दिवस - 13.25 कोटी

सातवा दिवस - 18.5 कोटी

आठवा दिवस - 10.25 कोटी

नववा दिवस –7.35 कोटी

चित्रपटाची एकूण कमाई- 237.25 कोटी

' टायगर 3' जागतिक कलेक्शन

पहिला दिवस- 94 कोटी

दुसरा दिवस- 88.16 कोटी

तिसरा दिवस – 67.34 कोटी

चौथा दिवस - 31.54 कोटी

पाचवा दिवस – २९.९१ कोटी

सहाव्या दिवशी - 22.43 कोटी

सातवा दिवस – ३२.१४ कोटी

आठवा दिवस – 19.68 कोटी

नववा दिवस- 13.75 कोटी

चित्रपटाचं एकूण कलेक्शन - 400.18 कोटी

हेही वाचा :

1. सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील इफ्फीमध्ये मोशन पोस्टर रिलीज

2.सारा अली खान आणि अनन्या पांडेनं रिलेशनशिपबद्दल भाष्य केल्यानं कार्तिक आर्यन नाराज

3.'डंकी'तलं पहिलं गाणं 'लूट पुट गया' रिलीज होणार, राजकुमार हिराणींची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details