ETV Bharat / entertainment

सारा अली खान आणि अनन्या पांडेनं रिलेशनशिपबद्दल भाष्य केल्यानं कार्तिक आर्यन नाराज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 5:16 PM IST

Kartik reacts to Sara Ananya comments : 'कॉफी विथ करण' शोमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल केलेली चर्चा कार्तिक आर्यनला रुचलेली नाही. नातेसंबंधावर सार्वजनिक पद्धतीनं चर्चा करताना परस्पर आदर राखला पाहिजे यावर कार्तिकनं भर दिला.

Kartik reacts to Sara Ananya comments
सारा अली खान आणि अनन्या पांडे

मुंबई - Kartik reacts to Sara Ananya comments : 'कॉफी विथ करण'च्या आठव्या पर्वात अभिनेत्री सारा अली खाननं तिच्या कार्तिक आर्यनसोबत असलेल्या पूर्वीच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी तिच्यासोबत कार्तिकची कथित गर्लफ्रेंड अनन्या पांडेही शोमध्ये सहभागी झाली होती. मात्र कार्तिकनं आपल्या आयुष्यातील या खासगी गोष्टींवर भाष्य करणं टाळलंय. एका मुलाखतीत जोर देऊन तो म्हणाला की, तो सार्वजनिक ठिकाणी नाते संबंधांवर चर्चा करण्याऐवजी त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो. यावेळी बोलताना त्यानं दोन लोकांचा समावेश असेल तर इतरांनी सार्वजनिकपणे चर्चा करणे टाळावं, असं सांगत नातेसंबंधांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे महत्त्वही अधोरेखित केलं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नातेसंबंधातील दोन्ही पक्षांनी गोपनीयता राखली पाहिजे, नातं सुरू राहिले नसलं तरीही एकत्र घालवलेल्या वेळेचा आदर करण्याचे महत्त्व कार्तिकनं सांगितलं. परस्पर आदर राखत नातेसंबंधबद्दल बोलताना दोन्ही व्यक्तींचा विचार करणे आवश्यक असल्याचंही तो म्हणाला.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एका मुलाखतीत कार्तिकला 'कॉफी विथ करण' शोमध्ये नात्यावर चर्चा करणाऱ्या लोकांकडे तो कसा पाहतो याबद्दल त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावेळी कार्तिक म्हणाला की, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील बडबड आवडत नाही. कार्तिक हिंदीत म्हणाला, "माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की जर एखादे नाते दोन व्यक्तींमध्ये असेल तर समोरच्या व्यक्तीनं त्याबद्दल बोलू नये. आपण सर्वांनी आपल्या नात्याचा आदर केला पाहिजे."

"एखाद्यानं नात्याबद्दल बोलणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत असता, तेव्हा गोष्टी पूर्ण होत नसल्याची कल्पना तुम्ही करत नसता. जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलता तेव्हा असं नाही की दुसरी व्यक्ती फक्त एका व्यक्तीबद्दल विचार करत असते, ते दोघांबद्दल विचार करत असतात,” असं करण जोहरच्या शोमध्ये त्याच्या विषयी झालेल्या चर्चेच्या संदर्भात कार्तिक आर्यन म्हणाला.

'लव्ह आज कल' चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान प्रेमात गुंतले होते, नंतर ते विभक्त झाले. दोघांच्यात ब्रेकअप होऊनही ते एकमेकांच्या मैत्रीत दिसतात, अनेकदा एकत्र कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे कार्तिक आणि अनन्याचं देखील एक नातं होतं, ज्याबद्दल करण जोहरनं 'कॉफी विथ करण'च्या एका भागात याचा खुलासा केला होता.

हेही वाचा -

  1. 'डंकी'तलं पहिलं गाणं 'लूट पुट गया' रिलीज होणार, राजकुमार हिराणींची घोषणा

2. सुहानासोबत शाहरुख सुरू करणार 'किंग'च शूटिंग, सिद्धार्थ आनंद निर्माता तर सुजॉय घोष करणार दिग्दर्शन

3. 'सिंघम' पुन्हा गर्जना करणार, अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.