ETV Bharat / entertainment

'डंकी'तलं पहिलं गाणं 'लूट पुट गया' रिलीज होणार, राजकुमार हिराणींची घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 3:47 PM IST

Fans trend Dunki Drop 2 on X : राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी ड्रॉप 2' ची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांचा अत्साह वाढलाय. 22 नोव्हेंबर रोजी डंकी चित्रपटातलं पहिलं गाणं 'लूट पुट गया' रिलीज होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - Fans trend Dunki Drop 2 on X : राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटाच्या 'डंकी ड्रॉप 2' ची प्रतीक्षा सध्या चाहते करताहेत. अशातच हिराणीनं 'डंकी ड्रॉप 2' लवकरच शेअर करणार असल्याचं कळवल्यानं शाहरुखच्या चाहत्यांना सोशल मीडियावर वादळ निर्माण केलंय. शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणीसह अनेक सहकलाकाराची भूमिका असलेल्या 'डंकी ड्रॉप 2' साठी रिलीजची तारीख 22 नोव्हेंबर रोजी निश्चित केली आहे.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटानं चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या रिलीजकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. चित्रपटाशी संबंधित व्याकीतनं सांगितलं की 'डंकी ड्रॉप 1' च्या यशानंतर आणि मनोरंजक पोस्टर्सनंतर निर्मात्यांनी 22 नोव्हेंबर रोजी 'लूट पुट गया' नावाचं डंकीचं पहिलं गाणं लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय.

राजकुमार हिराणीचा 20 नोव्हेंबर रोजी 61 वा वाढदिवस साजरा झाला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वाचं त्यानं आभार मानले आणि सांगितलं की, "माझ्या वाढदिवसानिमित्त तुमच्या प्रेमाबद्दल आणि हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या बदल्यात 'डंकी ड्रॉप 2' ची भेट 22 डिसेंबर 2023 रोजी सोडत आहे."

राजकुमार हिराणी यांच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीच खूप मोठी चर्चा आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज होणार असल्यामुळे चाहत्यांचा अत्साह द्विगुणीत झालाय. 'डंकी'च्या पहिल्या गाण्याचं साक्षीदार होणं शाहरुखच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंददायी ठरेल. हे गाणं 'लुट पुट गया' नावाचा एक रोमँटिक ट्रॅक आहे आणि यामध्ये विचित्र नृत्य स्टेप्सचा समावेश आहे. या गाण्याच्या स्टेप्स 'पीके' चित्रपटातील 'लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम' गाण्याच्या स्टेप्सची आठवण करुन देणारं आहे.

'डंकी ड्रॉप 1' मधील लक्ष वेधून घेणार्‍या संगीत आणि व्यक्तीरेखांच्या दृष्यांनी प्रेक्षकांच्या उत्साहाची पातळी आधीच वाढली आहे. त्यानंतर आकर्षक पोस्टर्स यामुळं चित्रपटाच्या भोवतीचं कुतुहल वाढलंय. या आठवड्यात 'लुट पुट गया' या पहिल्या गाण्याच्या रिलीजसह 'डंकी'चे निर्माते संगीतमय प्रवासाला सुरुवात करण्यास सज्ज आहेत.

'डंकी'मध्ये शाहरुख खानसोबत बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका आहेत. याची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. अभिजात जोशी, राजकुमार हिराणी आणि कनिका धिल्लन यांनी लिहिलेल्या पटकथेसह 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी जगभरात आणि 22 डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे. 'डंकी'ला बॉक्स ऑफिसवर प्रभासभूमिका असलेल्या 'सालार' चित्रपटाशी स्पर्धा करावी लागणार आहे. प्रभाससह पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू आणि ईश्‍वरी राव अभिनीत 'सलार' कन्नड, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांच्या डब आवृत्त्यांसह तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. सुहानासोबत शाहरुख सुरू करणार 'किंग'च शूटिंग, सिद्धार्थ आनंद निर्माता तर सुजॉय घोष करणार दिग्दर्शन

2. 'सिंघम' पुन्हा गर्जना करणार, अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

3. अल्लू अर्जुननं मुलगी अर्हाच्या वाढदिवासानिमित्त शेअर केली पोस्ट, पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.