महाराष्ट्र

maharashtra

Ranveers same tale of first meeting : अनुष्का आणि दीपिकांसोबतच्या पहिल्या भेटीचं रणवीरचं वर्णन सेम टू सेम, स्क्रिप्ट बदलण्याचा मिळाला सल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 12:38 PM IST

Ranveers same tale of first meeting : 'कॉफी विथ करण सीझन 8' च्या प्रीमियमध्ये रणवीर सिंगनं दीपिका पदुकोणसोबत झालेली पहिली भेटीचं रसभरीत वर्णन केलं. संजय लीला भन्साळींच्या घरी ते पहिल्यांदा भेटले होते. करण जोहरच्या या शोच्या तिसऱ्या सिझनमध्ये रणवीरनं अनुष्का शर्मासोबत झालेल्या भेटीचं असंच वर्णन केलं होतं. या दोन्ही वर्णनाची तुलना नेटिझन्सनी केली असून रणवीरनं थोडी स्क्रिप्ट बदलायला हवी होती, अशी टीका केलीय.

Ranveers same tale of first meeting
अनुष्का आणि दीपिकांसोबतच्या पहिल्या भेटीचं रणवीरचं वर्णन

मुंबई - Ranveers same tale of first meeting : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या आठव्या सीझनमधील पहिल्याच भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या प्रेमकथेबद्दलचा खुलासा केला. त्यांची पहिली भेट संजय लीला भन्साळी यांच्या घरी झाली होती. दीपिकानं दार उघडल्यानंतर ती त्याला देवदुता प्रमाणे भासली होती. यापूर्वी त्याची आणि अनुष्का शर्माची यशराज फिल्म्सच्या स्टुडिओत झालेल्या भेटीचेही सुंदर वर्णन रणवीरनं केलं होतं.

'कॉफी विथ करण 8' च्या प्रीमियरमधील दीपिका आणि रणवीरच्या कर्टन रेझर एपिसोडनं इंडरनेटवर खळबळ उडवून दिली. यापूर्वी याच शोमध्ये त्यानं अनुष्का शर्माची पहिली भेट कशी झाली होती याचं वर्णन केलं होतं. रणवीरनं दीपिकाच्या पहिल्या भेटीचं केलेलं वर्णन अनुष्काच्या भेटीशी मिळतं जुळतं आहे. रणवीरनं स्क्रिप्टमध्ये थोडा तरी बदल करायला हवा होता असं अनेक नेटिझन्सनी म्हटलंय.

रणवीरच्या बोलण्यावर ताशेरे ओढत एकानं लिहिलं, 'रणवीर भाई थोडी तो स्क्रिप्ट बदल कर लेता.' आणखी एकानं अशाच प्रकारची प्रतिक्रिया देताना लिहिलं, 'चेकी ये कौनसा स्क्रिप्ट है जो हर जगा समान है.'

12 वर्षापूर्वी रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा डेटिंग करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 'कॉफी विथ करण'च्या तिसऱ्या सिझनमध्ये ते दोघं एकत्र दिसले होते. त्यांनी 'बँड बाजा बारात', 'लेडीज वर्सेस रिकी बहल' आणि 'दिल धडकने दो' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण त्यांच्यात हे प्रेम प्रकरण आकाराला आले नाही. दरम्यान अनुष्का आणि विराट कोहलीच्या डेटिंगच्या बातम्या मथळे बनवत होत्या. अखेर 20217 मध्ये अनुष्कानं इटलीमध्ये विराटसोबत लग्नगाठ बांधली. अनुष्कानंतर रणवीरनं दीपिकाला डेट करायला सुरुवात केली आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला'च्या निर्मितीदरम्यान त्यांचं नातं फुललं. अखेर या जोडप्याने 2018 मध्ये लग्न केलं.

अलीकडील 'कॉफी विथ करण' भागादरम्यान रणवीर आणि दीपिकानं आपल्या प्रेम प्रकरणाचा खुलासा केला. दोघेजण लग्नापूर्वी तीन वर्षापासून एकमेकांमध्ये गुंतले होते. मालदीवमध्ये रणवीरनं तिला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ करण जोहरच्या शोमध्ये दोघांच्या तमाम चाहत्यांना पहिल्यांदाच दिसला.

हेही वाचा -

1. Tiger 3 advance booking : 'टायगर 3' च्या आगाऊ तिकीट विक्रीची तारीख जाहीर, चाहत्यांमध्ये उत्साह

2.MAMI Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन

3.Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव...

ABOUT THE AUTHOR

...view details