महाराष्ट्र

maharashtra

The Kerala Story Box Office : अदा शर्मा स्टारर वादग्रस्त चित्रपट 'द केरळ स्टोरी'चे 8 व्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

By

Published : May 13, 2023, 1:02 PM IST

अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला चांगली कमाई केली आहे. सुदीप्तो सेनच्या वादग्रस्त चित्रपटाला 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी एक दिवस लागेल.

द केरळ स्टोरी
The Kerala Story

मुंबई - सुदीप्तो सेनच्या 'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला चांगलीचं कमाई केली आहे. सातव्या दिवसाच्या तुलनेत, आठव्या दिवशीच्या संकलनात वाढ किंवा कमी झाली नाही. या चित्रपटाला 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी एक दिवस आणखी लागेल असे दिसते. 'द केरळ स्टोरी'ने सातव्या दिवशी 12.50 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर आठव्या दिवशी देखील या चित्रपटाने 12.50 कोटी इतकेचं रुपये कमावले. सुरूवातीपासून जर या चित्रपटाकडे पाहिल तर एकून कमाई 94 कोटींहून अधिक झाली आहे. हिंदी भाषिक या चित्रपटाला जास्त प्रमाणात बघत आहेत. चित्रपटाला बघण्यासाठी अजूनही थिएटरमध्ये चांगली गर्दी होतांना दिसत आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करणार आहे, असे दिसते.

बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'द केरळ स्टोरी'ने चित्रपटगृहांमध्ये 8.03 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवरच्या कमाईत वाढ झाली. या चित्रपटाने शनिवारी 11.22 कोटी रुपयांची कमाई केली आणि रविवारी 16.40 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या सोमवारी एकूण 10.07 कोटी, त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी 11.14 कोटी आणि 12 कोटीची कमाई केली. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 'अभूतपूर्व' आणि 'डोळे उघडणारे' असल्याचे म्हटले आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट लवकरच सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला कमाईत मागे टाकू शकतो, या चित्रपटाने आतापर्यंत केवळ 107.71 कोटी रुपयांची कमाई केली.

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे करत आहे आकर्षित : 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर ज्या दराने विस्तारत आहे. त्यावरून असे दिसत आहे की कमाईच्याबाबतीत हा चित्रपट सर्व चित्रपटांना मागे टाकेल. अदा शर्माच्या नेतृत्वाखालील हा चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटाने ( 82.04 कोटीची), कमाई केली तर अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटाने ( 16.85 कोटीची), कमाई केली आहे, तर कार्तिक आर्यनच्या शेहजादा या चित्रपटाने ( 32.20 कोटी) इतकी कमाई केली आहे. या सर्व चित्रपटांना 'द केरळ स्टोरी' मागे टाकत आहे, असे चित्र दिसत आहे. तर , विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावर 'द केरळ स्टोरी' मात करू शकेल की नाही, हे येणाऱ्या काळात समजेल. दरम्यान, आता तरी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला कोणतीही स्पर्धा नाही, असे दिसत आहे. 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे.

हेही वाचा :Parineeti And Raghav Engagement : परिणीती आणि राघव यांचा दिल्लात साखरपुडा ; प्रियांका चोप्रा कार्यक्रमासाठी दिल्लीत दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details