महाराष्ट्र

maharashtra

69th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आलिया भट्ट, क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुनचे फोटो झाले व्हायरल...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 11:32 AM IST

69th National Film Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवले. यानंतर, काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये पुरस्कार विजेते आलिया भट्ट, क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुन हे धमाल करताना दिसत आहेत.

69th National Film Award
69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मुंबई - National Film Awards :69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 17 ऑक्टोबर रोजी दिल्लीत पार पडला. दरम्यान आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर आलिया भट्ट, क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुन यांनी खूप धमाल केली, त्यांच्या काही मस्ती करण्याच्या झलक आता पाहायला मिळत आहे. एकीकडे आलिया भट्ट पती रणबीर कपूरला किस करताना एका फोटोत दिसत आहे. दुसरीकडे, अल्लू अर्जुन बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत पुष्पाची सिग्नेचर स्टेप करताना फोटोमध्ये दिसत आहे. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित होते.

आलियाने लग्नातील साडी का नेसली? :आलिया भट्टनं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तीच साडी नेसली होती जी तिनं तिच्या लग्नाच्या दिवशी परिधान केली होती. या साडीवर तिनं लाईट मेकअप केला होता. यावर तिनं डायमंड नेकलेससह इयररिंग्स घातले होते. याशिवाय लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं पांढऱ्या रंगाची गुलाबाची फुले लावली होती. या लूकमध्ये ती खूप खास दिसत होती. आलियानं तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. या फोटोवर तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, 'एखाद्यानं एखाद्या खास दिवशी खास पोशाख घालायला हवा. आणि काहीवेळा आपल्याकडे आधीपासूनच तो विशेष पोशाख असतो. तुमच्या खास दिवशी तुम्ही परिधान केलेल्या पोशाखापेक्षा विशेष काय असू शकते? त्यामुळे प्रत्येक खास प्रसंगी ते परिधान करून याला अधिक खास बनवा'. राष्ट्रीय पुरस्कारासोबत आलियासोबत रणबीरनं अनेक सेल्फी यावेळी घेतल्या. रणबीर हा पत्नीसाठी खूप आनंदी आहे.

अल्लू अर्जुन क्रिती सेनॉन फोटो :दाक्षिणात्य कलाकार अल्लू अर्जुन आणि क्रिती सेनॉन हे एकत्र बसले होते. आता त्यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. क्रितीनं अल्लू अर्जुनसोबत खूप सेल्फी घेतल्या आहेत. एका व्हायरल झालेल्या सेल्फीनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुन आणि क्रिती 'पुष्पा'ची सिग्नेचर पोझ करताना दिसत आहेत. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय अल्लू अर्जुन, आलिया आणि क्रितीनं देखील एका फोटोसाठी पोझ दिली आहे. या फोटोमध्ये तिघेही खूप खास दिसत आहेत. अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. boyz 4 Ye Na Raani song out : 'बॉईज 4' चित्रपटामधील 'ये ना राणी’ हे धमाल गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
  2. Kriti Sanon National Award : क्रिती सेनॉननं आई वडिलांसोबत आनंद साजरा केला राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद
  3. Vishnudas Bhave Gaurav Padak Award : प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details