हैदराबाद- दक्षिणेतील अभिनेता नागा चैतन्य 23 नोव्हेंबर रोजी 36 वर्षांचा झाला आहे. नागाचा जन्म 23 नोव्हेंबर 1986 रोजी हैदराबादमध्ये झाला होता. नागा हा टॉलीवूडचा राजा अक्किनेनी नागार्जुनचा मुलगा आहे. या खास प्रसंगी नागाने त्याच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. नागाच्या 'कस्टडी' या नव्या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.
व्यंकट प्रभू दिग्दर्शित 'कस्टडी' चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये नागा एका दमदार भूमिकेत दिसत आहे. पोलिसांनी अभिनेत्याला चारही बाजूंनी घट्ट पकडले असून त्याच्या डोक्यावर बंदूक रोखली आहे. नागा त्याच्या व्यक्तीरेखेनुसार पूर्णपणे दबंग शैलीत दिसत आहे.
'कस्टडी' हा नागा चैतन्यचा 22 वा चित्रपट आहे. हा चित्रपट तेलगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकट प्रभू आहेत आणि चित्रपटाचे निर्माते श्रीनिवास चित्तुरी आहेत. चित्रपटातील उर्वरित स्टारकास्टचा खुलासा झालेला नाही. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.