ETV Bharat / entertainment

ओटीटीवर दिसत असताना पैसे खर्च करुन लोक थिएटरमध्ये सिनेमा का पाहतील, आर बाल्कींचा सवाल

author img

By

Published : Nov 23, 2022, 1:17 PM IST

निर्माता दिग्दर्शक आर. बाल्की यांनी प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग सध्या थिएटरपेक्षा ओटीटीला का प्राधान्य देत आहे यावर आपले मत प्रदर्शित केले. इफ्फीच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान बाल्की यांनी याबाबत वृत्तसंस्थेला सांगितले.

आर बाल्कींचा सवाल
आर बाल्कींचा सवाल

पणजी (गोवा) - चित्रपटाच्या प्रदर्शनात अनेक बदल घडत असून आता काळ बदलला आहे. विशेषत: ओटीटीमुळे चित्रपट पाहण्याचे प्रमाणही बदलले आहे. अनेक प्रेक्षकांनी तर सिनेमागृहात जाणेही बंद केले आहे कारण त्यांना थिएटरमध्ये कंटेंट पाहण्यापेक्षा डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि शो पाहणे सोपे वाटत आहे.

'पा' आणि 'पॅडमॅन' सारख्या अभूतपूर्व चित्रपटांमागील मुख्य व्यक्ती, चित्रपट निर्माते आर. बाल्की यांनी प्रेक्षकांचा एक मोठा वर्ग सध्या थिएटरपेक्षा ओटीटीला का प्राधान्य देत आहे यावर आपले मत प्रदर्शित केले.

"जेव्हा लोकांपर्यंत कोणतीही गोष्ट सहज येते तेव्हा ते जास्त पैसे देऊन चित्रपटगृहात जाऊन चित्रपट का पाहतील...म्हणून तुम्हाला (निर्मात्यांना) लोकांमध्ये इतका उत्साह निर्माण करावा लागेल की त्यांना अक्षरशः बाहेर काढून चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी भाग पाडायला हवे," असे गोव्यातील 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान बाल्की यांनी एएनआयला सांगितले.

आर. बाल्कीचा नवीन म रिलीज 'चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' आता 25 नोव्हेंबर रोजी डिजिटल प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज आहे. 23 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एका सिरीयल किलरच्या भोवती फिरतो जो कलाकारांचा अपमान केल्याबद्दल टीकाकारांची निर्घृणपणे हत्या करतो.

बाल्की यांना विचारले की ते त्यांच्या चित्रपटांचे परीक्षण वाचतात का? यावर त्यांनी उत्तर दिले, "मी रिव्ह्यू अजिबात वाचत नाही. मी कधीच रिव्ह्यू वाचत नसे. मात्र, चूपच्या मेकिंगदरम्यान मी मागे जाऊन माझ्या चित्रपटांचे सर्व रिव्ह्यू वाचले. 'चुप'नंतर, मी पुन्हा एकदा रिव्ह्यू वाचणे बंद केले.

बाल्की पुढे म्हणाले, "आता रिव्ह्यू वाचणे कठीण आहे कारण ते वेगवेगळ्या कोनातून लिहिलेले असतात.... मला चित्रपट आवडला की नाही हे मी स्वतः ठरवू शकतो."

बाल्कीच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलताना म्हणाले की ते घुमर हा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट कॅरोली टाकॅक्सच्या कथेपासून प्रेरित आहे, उजव्या हाताचा हंगेरीचा दिवंगत शूटर कॅरोली टाकॅक्स अपघातानंतर हात जखमी झाल्यामुळे डाव्या हाताने शुट करतो व ऑलम्पिकची दोन सुवर्ण पदके जिंकतो. या कथेवर बाल्की आगामी चित्रपट बनवत आहेत. यात अभिषेक बच्चन, शबाना आझमी, अंगद बेदी आणि सैयामी खेर यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा - विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' मधील पडद्यामागच्या धमाल मस्तीचा व्हिडिओ रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.