महाराष्ट्र

maharashtra

मन्सूर अली खानच्या वादग्रस्त विधाननंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिलं चोख प्रत्युत्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 5:57 PM IST

Trisha Krishnan and Mansoor Ali Khan : मन्सूर अली खाननं त्रिशा कृष्णनसोबतच्या रेपच्या सीनबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स त्याच्यावर टीका करताना सध्या दिसत आहेत. त्रिशा कृष्णन यावर आता प्रत्युत्तर दिलं आहे.

controversial speech
वादग्रस्त विधान

मुंबई - Trisha Krishnan and Mansoor Ali Khan :तामिळ अभिनेत्री त्रिशा कृष्णननं बेडरूम सीनवर तमिळ अभिनेता मन्सूर अली खानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मन्सूर अली खाननं पत्रकार परिषदेत सांगितले होते की, 'जेव्हा मला कळलं की मी त्रिशासोबत काम करत आहे, तेव्हा मी विचार केला की, आमच्यामध्ये एक बेडरूम सीन असेल, पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर त्रिशा कृष्णननं याबद्दल निंदा करत एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहलं, 'अलीकडेच एक व्हिडिओ आला आहे, ज्यामध्ये श्री मन्सूर अली खान यांनी माझ्याबद्दल असभ्य आणि घृणास्पद पद्धतीनं बोलत आहे. मी याचा तीव्र निषेध करते. हे लिंगभेद करणारे, स्त्रीचा अपमान करणारे विधान आहे. पुढं तिनं लिहलं, 'त्याची इच्छा असेल पण मला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली नाही याबद्दल मी आभारी आहे. पण माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीत असे कधीही होऊ नये, असे मला म्हणायचे आहे. त्यांच्यासारखे लोक मानवतेला बदनाम करतात'.

मन्सूर अली खानचं वादग्रस्त विधान : मन्सूर अली खाननं अनेक चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत रेप सीन केले आहेत. या चित्रपटाची शुटिंग काश्मीरमध्ये झाली मात्र, त्या दरम्यान त्रिशाला अनेकांना शूटिंग सेटवर बघितले नाही. त्रिशा कृष्णन ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मन्सूर यांच्या या वक्तव्यावर आता त्रिशा कृष्णन आणि 'लिओ' चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कांगराज यांनी देखील टीका केली आहे. मन्सूरला महिला विरोधी वक्तव्यामुळं सोशल मीडियावर प्रचंड विरोध होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कंगराज यांनीही मन्सूर यांच्यावर टीका करत एक्सवर लिहलं, ''मन्सूर अली खानच्या वक्तव्यानं मी दुखावलो गेलो आहे. मला राग येत आहे. आम्ही एकाच टीममध्ये काम केले आहे. कोणत्याही महिलेचा आणि सहकाऱ्यांचा आदर करणे आवश्यक आहे. मी या वृत्तीचा निषेध करतो.''

'लिओ' चित्रपटाची स्टार कास्ट : मन्सूर खाननं यापूर्वी अभिनेता रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटातील 'कावला' या गाण्यातील अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या डान्सवरही त्यांनी असेच विधान केले होते. ऑगस्ट 2023 मध्ये मन्सूर अली खान यांनी तमन्नाच्या या गाण्यावर असभ्य कमेंट केली होती, ज्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली होती. 'लिओ' या चित्रपटात संजय दत्त, अर्जुन सर्जा, त्रिशा कृष्णन आणि मन्सूर अली खान यांसारखे प्रमुख कलाकार होते. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला आहे.

हेही वाचा :

  1. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी नरेंद्र मोदी स्टेडियमवर; फोटो व्हायरल
  2. बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्राचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ व्हायरल
  3. 'धूम' आणि 'धूम 2' सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी काळाच्या पडद्याआड

ABOUT THE AUTHOR

...view details