ETV Bharat / entertainment

बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्राचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ व्हायरल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 3:03 PM IST

Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं त्याच्या जीवलग मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये जबरदस्त डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sidharth Malhotra
सिद्धार्थ मल्होत्रा

मुंबई - Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याच्या मित्राच्या लग्नात खूप धमाल करत आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात त्यानं जबरदस्त डान्स केला. या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. सिद्धार्थचे व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत. व्हिडिओंमध्ये सिद्धार्थ त्याच्या खास मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये डान्स करत आहे. सिद्धार्थच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करून त्याचे कौतुक करत आहेत. चाहत्यांना लग्नातमधील त्याची स्टाईल खूप आवडली आहे. एका यूजरनं कमेंट करत पोस्टवर लिहलं, ''खूप चांगला डान्स करत आहे'' दुसऱ्या एकानं लिहलं, ''प्रत्येकाला असा मित्र असलाच पाहिजे''. आणखी एकानं लिहलं, ''तू खूप खास दिसत आहे'' अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्टवर येत आहेत.

सिद्धार्थचा डॅशिंग लूक : लग्नात सिद्धार्थचा लूक खूपच स्टायलिश होता. तो खूपच देखणा दिसत होता. सिद्धार्थनं या लग्नात ऑफ व्हाईट कलरची शेरवानी घातली होती. यावर त्यान काळा चष्मा आणि घातला होता. सिद्धार्थनं काळा चष्मा घातलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, "बऱ्याच दिवसानंतर काला चष्मा." सिद्धार्थच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी ही पोस्ट लाईक केली आहे आणि कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरनं लिहलं, 'पुन्हा लग्न कर, आम्ही तयार आहोत'.

सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी चित्रपट : सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या त्याच्या आगामी ''योद्धा'' चित्रपटामुळं चर्चेत आहे. ''योद्धा'' १५ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिशा पटानी आणि राशि खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक अ‍ॅक्शन मनोरंजन चित्रपट असणार आहे. सिद्धार्थ शेवटी ''मिशन मजनू'' चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसला होता. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

  1. उर्वशी रौतेला ते रविना टंडन, वर्ल्ड कपसाठी ''या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा
  2. 'धूम' आणि 'धूम 2' सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी काळाच्या पडद्याआड
  3. मल्याळम अभिनेता विनोद थॉमसचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.