महाराष्ट्र

maharashtra

Ind vs pak 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या शानदार विजयानंतर सेलिब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव; पहा कोण काय म्हणाले...

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 1:03 PM IST

Ind vs pak 2023 : भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील अजय देवगणपासून तर महेश बाबूपर्यंत चित्रपटसृष्टीतील भारतीय क्रिकेट संघाच्या शानदार विजयानंतर अभिनंदन केले.

Ind vs pak 2023
भारत vs पाकिस्तान 2023

मुंबई - Ind vs pak 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये झालेल्या शानदार सामन्यात भारतानं पाकिस्तानचे 7 गडी राखून पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाच्या शानदार गोलंदाजी आणि फलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत. या दणदणीत विजयानंतर संपूर्ण देशात आनंद साजरा करण्यात आला. पाकिस्तानसोबतचा सामना हा प्रत्येकजणांसाठी खूप महत्वाचा होता. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियानं भारतीयांना सेलिब्रेशन करण्याची संधी दिली आहे. या विजयानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी काही पोस्ट शेअर करून भारतीय संघाचे अभिनंदन केले आहेत.

बॉलिवूड स्टार्सच्या पोस्ट:

  • सनी देओलची पोस्ट : अभिनेता सनी देओलने विजयाच्या फोटोसोबत लिहिलं, 'हिंदुस्तान झिंदाबाद, आमच्या 'मेन इन ब्लू'ने आज क्रिकेटच्या मैदानात जबरदस्त कामगिरी केली, टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन. संपूर्ण देश या मोठ्या विजयाच्या जल्लोषात मग्न झाला आहे'.
  • अजय देवगणची पोस्ट : अभिनेता अजय देवगणनं इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'बेस्ट बॉलिंग अटॅक, बेस्ट बॅटिंग लाइन-अप, आमच्याकडे हे सर्व आहे. विश्वचषक ट्रॉफी. आम्ही पोहोचलो.
भारत vs पाकिस्तान 2023
  • आयुष्मान खुरानाची पोस्ट :अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानानं त्याच्या एका फोटोसह इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं,'प्रत्येक प्रसंगी पराभूत केले. टीम इंडिया खूप छान खेळली'
भारत vs पाकिस्तान 2023
  • करीना कपूर पोस्ट :अभिनेत्री करीना कपूरनं इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले की,'अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही आम्हाला नेहमीच अभिमानाने भरता.'
  • अनिल कपूरची पोस्ट : अभिनेता अनिल कपूरनं इंस्टाग्राम स्टोरीवर लिहलं, 'पाकिस्तानवर भारताच्या विजयाची गर्जना. काय सामना, काय विजय' टीम इंडिया'.
भारत vs पाकिस्तान 2023

भारतीय संघावर अभिनंदाचा वर्षाव : याशिवाय दाक्षिणात्य सिनेमातील महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांनी टीम इंडियाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा सामना संपूर्ण देशासाठी खूप महत्वाचा होता. अनेकजणांच्या नजरा या सामन्यावर होत्या. टीम इंडियाच्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदी आहे. 14 ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी भारतीय संघ जिंकल्यानंतर फटाके उडविण्यात आले. हा विजय भारतासाठी खूप मोठा आहे.

भारत vs पाकिस्तान 2023

हेही वाचा :

  1. Khatron Ke Khiladi 13: रॅपर आणि गायक डिनो जेम्सनं अर्जित तनेजाला केले पराभूत; खतरों के खिलाडी 13' सीझनचा ठरला विजेता
  2. India vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात चक्क अरिजित सिंगनं काढला 'या' अभिनेत्रीचा फोटो; एक्सवर व्हिडिओ व्हायरल
  3. Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं राखी सावंतविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल...

ABOUT THE AUTHOR

...view details