महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Chaturthi 2023: आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसह सेलेब्रिटींनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 6:30 PM IST

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, करीना कपूर खानसह अनेक सेलेब्रिटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अतिशय उत्साहात यंदाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे.

Ganesh Chaturthi 2023
गणेश उत्सव २०२३

मुंबई- Ganesh Chaturthi 2023: पारंपरिक उत्सवात यंदाच्या गणेश उत्सवाला देशभर सुरुवात झाली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटींनीही नव्या उत्सहात बाप्पाचे स्वागत केले आणि दर्शनासाठी मंडपातही रांगा लावल्या. अनेक सेलेब्रिटींच्या घरी आज गणपती बाप्पाचे आगमन झाले. अभिनेत्री आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, करीना कपूर खानसह अनेक सेलेब्रिटींनी आपल्या चाहत्यांना गणेश उत्सवाच्या शुभच्छा दिल्या आहेत.

मंगळवारी कार्तिक आर्यनने मुंबईमधील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. या प्रसंगी, कार्तिकने पांढर्‍या पँटसह किरमिजी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. कार्तिकने आपल्या इंस्टाग्रामवर गणेश उत्सवाचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे. गणपती बाप्पा मोरया.'

अनन्या पांडेनेही बाप्पाचे स्वागत करत दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यासाठी अनन्याने बेबी पिंक सूट घातला होता. एका फोटोमध्ये ती आपल्या कुटुंबासह पोज देताना दिसतेय. आलिया भट्ट आणि करीना कपूरनेही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांना शुभेच्छा संदेश देऊन उत्साहित केलं आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनीही सोशल मीडियावरुन बाप्पाच्या आगमनाबद्दल चाहत्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपआपल्या घरामध्ये बाप्पाचे स्वागत करताना सर्व अडथळे पार करुन जीवन आनंदाने समृद्ध करा, असा संदेश अक्षय कुमारनं चाहत्यांना दिला. गणपती बाप्पा मोरया! चतुर्थी की गणेश शुभेच्छा, असेही त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय. 'गणपती बाप्पाचे आगमनाने आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आपल्याला बुद्धी लाभो. आपल्या सर्वांना आनंददायी आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!', असे अभिनेता सुनिल शेट्टीने म्हटलंय.

गणेश चतुर्थीचा सण संपूर्ण भारतभर अत्यंत उत्साहात साजरा होत असतो. पूर्वी घरा घरात बाप्पाचे आगमन व्हायचे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात करुन त्याला सार्वजनिक स्वरुप दिले. आज महाराष्ट्रात लाखो गणेश उत्सव मंडळे कार्यरत असून मुंबईत भव्य प्रमाणात उत्सव साजरा होतो. पुण्याचा पारंपरिक उत्सवही संपूर्ण राज्याचा अभिमान ठरतोय. महाराष्ट्रातील सर्व छोट्या मोठ्या शहरातून खेड्या पाड्यातून हा उत्सव थाटात साजरा होत असताना याचे लोन आता संपूर्ण देशभर पसरलं आहे.

हेही वाचा -

१.Ganesh Festival Celebration Of Celebrities: पाहा 'या' सेलिब्रेटींच्या घरी झालंय गणपती बाप्पाचं आगमन

२.Jaane Jaan screening : 'जाने जान' स्क्रीनिंगमध्ये लव्हबर्ड्स विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाने जिंकली मने

३.Parliament Special Session : महिला आरक्षणाचा निर्णय ऐतिहासिक, कंगना रणौतची प्रतिक्रिया, इशा गुप्ता निवडणूक लढवणार?

ABOUT THE AUTHOR

...view details