ETV Bharat / entertainment

Jaane Jaan screening : 'जाने जान' स्क्रीनिंगमध्ये लव्हबर्ड्स विजय वर्मा आणि तमन्ना भाटियाने जिंकली मने

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 5:06 PM IST

Jaane Jaan screening : करीना कपूर खान आणि विजय वर्माच्या आगामी जाने जान या चित्रपटाचे एका विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होतं. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अभिनेता विजय वर्मासह नोरा फतेही, कार्तिक आर्यन, अर्जुन कपूर आणि इतर सेलेब्रिटीही हजर होते. यावेळी विजय वर्मासोबत त्याला चिअर्स करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाही आली होती.

Jaane Jaan screening
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया

मुंबई - Jaane Jaan screening : अभिनेत्री करीना कपूर खान आणि विजय वर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आगामी जाने जान या ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटाचे एका विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होतं. या स्क्रिनिंगला बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता विजय वर्मा, नोरा फतेही, कार्तिक आर्यन, अर्जुन कपूर आणि इतर सेलेब्रिटीही हजर होते. यावेळी विजय वर्मासोबत त्याला चिअर्स करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाही आली होती.

पापाराझी उकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया स्क्रिनिंगच्या ठिकाणी हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी अनेक हौशी फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोजही दिल्या. या लव्हबर्ड्सच्या धमाकेदार केमिस्ट्रीने पुन्हा एकदा अनेकांची मने जिंकली आहेत. या स्क्रिनिंगसाठी विजय वर्माने काळ्या टी-शर्टसह तपकिरी प्रिंटेड सूट निवडला होता, तर नेव्ही ब्लू वनपीस डेनिम ड्रेसमध्ये तमन्ना भाटिया खूपच सुंदर दिसत होती.

सुजॉय घोष दिग्दर्शित 'जाने जान' हाचित्रपट जपानी कादंबरी 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' चे हिंदी रूपांतर आहे. मिस्ट्री थ्रिलर असलेला हा चित्रपट पश्चिम बंगालमधील टेकडीवर वसलेल्या कालिम्पॉन्ग शहराच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आलाय. करीना कपूर आणि विजय वर्मा यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात जयदीप अहलावत देखील मुख्य भूमिकेत आहे. जाने जान चित्रपट २१ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

'जाने जान' या चित्रपटाशिवाय विजय वर्माच्या हातामध्ये अफगानी स्नो आणि मर्डर मुबारक हे चित्रपट देखील आहेत. दुसरीकडे, तमन्ना भाटिया अखेरची विजय वर्मासोबत लस्ट स्टोरीज 2 मध्ये झळकली होती. त्यानंतर तिने मेगास्टार रजनीकांतसोबत 'जेलर' या गाजलेल्या तमिळ चित्रपटात काम केलं. तिचा आगामी वेदा हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.

जाने जानचा ट्रेलर : जाने जान चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि प्रेक्षकांच्या पंसतीस उतरल्याचे दिसलं होतं. या ट्रेलरमध्ये विजय वर्मा हा एका हत्येचं गूढ उकलण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसतो. खुनाचे रहस्य लपवण्यासाठी करीना जयदीप अहलावत आणि विजय वर्माला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. यातील करीनाचा किसींग सीनही चर्चेचा विषय बनला होता. करीनाच्या शेजारी राहणारा जयदीप अहलावतने आणि पोलीसाच्या भूमिकील विजय वर्मा यात महात्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

१. Parliament Special Session : महिला आरक्षणाचा निर्णय ऐतिहासिक, कंगना रणौतची प्रतिक्रिया, इशा गुप्ता निवडणूक लढवणार?

२. Parineeti Chopra- Raghav Chaddha wedding: राघव चड्ढाशी लग्नापूर्वी परिणीती चोप्राच्या मुंबईतील घरावर रोषणाई

३. SS Rajamouli announces Made in India : एसएस राजामौलींनी केली 'मेड इन इंडिया'ची घोषणा, बनवणार दादासाहोब फाळकेंचा बायोपिक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.