महाराष्ट्र

maharashtra

"भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त" - पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची आदरांजली

By

Published : May 10, 2022, 2:41 PM IST

पंडित शिवकुमार शर्मा

ज्येष्ठ संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदू पैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत शोक व्यक्त केला. तसेच पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. डित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाने आपले सांस्कृतिक जग अधिकच गरीब झाले आहे. त्यांनी संतूरला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

मुंबई - संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा संतूर अलौकिक तरंग आणि भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानवी दोस्ताला गेला आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार संतूर वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ज्येष्ठ संगीतकार पंडित शर्मा यांच्या संतूर अलौकिक स्वरांनी केवळ भारतीय नव्हे तर जगाला भुरळ घातली. जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, याभूमीत संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगाची पंडित यांनी जगाला ओळख निर्माण करून दिली. जगभरात गीते भारतीय पोचले आहेत. तेथे संतूर पोहोचले आहे. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राचे अखंड सेवा केली, त्यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापि विसरता येणार नाही, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. तसेच शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदू पैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत शोक व्यक्त केला. तसेच पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''पंडित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाने आपले सांस्कृतिक जग अधिकच गरीब झाले आहे. त्यांनी संतूरला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालत राहील. मला त्यांच्याशी झालेला संवाद आठवतो. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.''

ज्येष्ठ सरोज वादक अमजद अली खान यांनी पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असे त्यांनी म्हटलंय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. ते संतूरचे प्रणेते होते आणि त्यांचे योगदान अतुलनीय आहे. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे आणि मी त्याला कधीही चुकवणार नाही. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्याचे संगीत सदैव जिवंत आहे! ओम शांती.''

हेही वाचा -पंडित शिवकुमार शर्मा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details