महाराष्ट्र

maharashtra

'अ‍ॅनिमल'मधील वैवाहिक बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणाबाबत बॉबी देओलनं दिली 'ही' प्रतिक्रिया

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 4:37 PM IST

Bobby deol : अभिनेता बॉबी देओल हा सध्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटातल्या त्याच्या खलनायकाच्या व्यक्तिरेखेसाठी चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झपाट्यानं कमाई करत आहे. दरम्यान, या चित्रपटामधील वैवाहिक बलात्काराच्या दृश्याच्या चित्रीकरणाबाबत बॉबीनं प्रतिक्रिया दिली आहे.

Bobby deol
बॉबी देओल

मुंबई - Bobby deol :अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपट रुपेरी पडद्यावर जोरदार कमाई करत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात 13 ते 15 मिनिटांच्या भूमिकेत बॉबी देओलनं चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. बॉबी देओलचं एंट्री गाणं 'जमाल कुडू' हे खूप लोकप्रिय झालं आहे. या गाण्यावर अनेक रिल्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान 'अ‍ॅनिमल' चित्रपटात अबरार हक नावाच्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा बॉबी देओल त्याच्या तिसऱ्या पत्नीसोबतच्या वैवाहिक बलात्काराच्या सीनमुळं खूप चर्चेत आहे. अबरार हकच्या तिसऱ्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मानसी तक्षकने साकारली आहे.

बॉबी देओल अ‍ॅनिमल' चित्रपटावर प्रतिक्रिया :सध्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर अनेकजण टोकाच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत. अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय. तर अनेकांसाठी यातलं चित्रीकरण अतिरंजीत आहे. यातल्या बॉबी देओलच्या वैवाहिक बलात्काराच्या सीनवर अनेकजण आक्षेप घेत आहेत. दरम्यान यावर मानसी तक्षकनं आपलं मत स्पष्ट केलं असून तिनं, आपल्याला या सीनवर कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे. या वादग्रस्त दृश्यावर बॉबी देओलनंदेखील प्रतिक्रिया दिली आहे. वैवाहिक बलात्काराच्या दृश्याबद्दल उघडपणे बोलताना एका मुलाखतीत बॉबीनं म्हटलं, ''जेव्हा मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल ऐकलं तेव्हापासून मला खात्री होती की ती मूक खलनायकाची भूमिका असली तरी मी त्यात प्राण फुंकेन. खरं तर, जेव्हा माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं, तेव्हा माझ्यातली ऊर्जा खूप प्रबळपणे मला दाखवायची होती. मला माझा चेहरा आणि चारित्र्य हे क्रूर दाखवायचं होते की, एक वाईट व्यक्ती आपल्या पत्नीचादेखील होऊ शकत नाही. मला कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा अडचणींचा सामना करावा लागला नाही. माझी ही व्यक्तिरेखा या सर्व चुकीच्या गोष्टींवर आधारित होती, पण मला हे पडद्यावर आणावं लागलं''.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची बंपर कमाई : रणबीर आणि बॉबीच्या 'अ‍ॅनिमल'नं अवघ्या 10 दिवसांत देशांतर्गत 431.27 कोटी आणि जगभरात 717 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाकडे शाहरुख खानच्या 'जवान' आणि' पठाण' या दोन चित्रपटांचे जागतिक कमाईचे रेकॉर्ड तोडण्यासाठी 12 दिवस आहेत. याशिवाय आता रुपेरी पडद्यावर शाहरुख खानचा 'डंकी' 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे, त्यामुळे 2023 वर्षअखेरीस कुठला चित्रपट क्रमांक एकवर राहील हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची जगभरात झाली 700 कोटींची कमाई
  2. प्रभासच्या 'सालार भाग 1 : सीझफायर'ला सेन्सॉर बोर्डाकडून मिळालं 'ए' प्रमाणपत्र
  3. इस्रायल आणि हमासच्या लढाईतील गोळीबारात अडकलेल्या मुलांच्या समर्थनात उतरली प्रियंका चोप्रा

ABOUT THE AUTHOR

...view details