ETV Bharat / entertainment

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची जगभरात झाली 700 कोटींची कमाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 3:31 PM IST

Animal enters Rs 700 cr Club Globally : रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक होता. रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. दरम्यान हा चित्रपट रिलीजच्या अकराव्या दिवसात आहे.

Animal enters Rs 700 cr Club Globally
'अ‍ॅनिमल'नं जागतिक स्तरावर रु. 700 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला

मुंबई - Animal enters Rs 700 cr Club Globally : अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओलचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'अ‍ॅनिमल'च्या यशामुळे या चित्रपटाची स्टारकास्टही जगभरात चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. 'अ‍ॅनिमल' गेल्या 10 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या 11व्या दिवसात आहे. 'अ‍ॅनिमल'नं 'जवान', 'पठाण', 'गदर 2' 2023 च्या सर्व मेगा ब्लॉकबस्टर्सना मागे टाकले आहे. 'अ‍ॅनिमल'नं रुपेरी पडद्यावर एक इतिहास रचला आहे. या चित्रपटानं 10 व्या दिवसाच्या कमाईसह जगभरातील 700 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा चित्रपट झपाट्यानं कमाई करत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं एकूण कलेक्शन : 'अ‍ॅनिमल'नं रिलीजच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी देशांतर्गत 36 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 431.27 कोटी झालं आहे. रिलीजच्या अकराव्या दिवशी हा चित्रपट 2.86 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 434.13 होईल. शनिवारी 9 तारखेपर्यंत या चित्रपटानं जगभरात 660.67 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दहाव्या दिवशी या चित्रपटानं 717.46ची कमाई केली. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदन्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती दिमरी सौरभ शुक्ला, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा आणि सुरेश ओबेरॉय या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. हा चित्रपट आता लवकरच 1000 कोटींचं लक्ष पार करेल असं सध्या दिसत आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये बॉबी देओलने साकारलेला खलनायक चित्रपटरसिकांची वाहवा मिळवतोय.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं कलेक्शन

शुक्रवार पहिला दिवस - 63.8 कोटी

शनिवार दुसरा दिवस - 66.27 कोटी

रविवार तिसरा दिवस - 71.46 कोटी

सोमवार चौथा दिवस 43.96 कोटी

पहिला मंगळवार पाचवा दिवस 37.47 कोटी

पहिला बुधवार सहावा दिवस 30.39 कोटी

पहिला गुरुवार सातवा दिवस 24.23 कोटी

पहिला आठवडा एकूण कलेक्शन 337.58 कोटी

दुसरा शुक्रवार आठवा दिवस 22.95 कोटी

दुसरा शनिवार नव्वा दिवस 34.74 कोटी

दुसरा रविवार दहावा दिवस 36 कोटी

दुसरा सोमवार अकरवा दिवस 2.86 कोटी कमाई करू शकतो

चित्रपटाचं एकूण 434.13 कोटी

हेही वाचा :

  1. शाहरुख खाननं नवीन ट्रॅकची झलक दाखवत 'डंकी' शीर्षकाचा अर्थ सांगितला
  2. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'खो गए हम कहाँ'चं ट्रेलर रिलीज
  3. सलमान खाननं वाचवलं होतं अनुष्का-विराटचं नातं ; जाणून घ्या या मागची कहाणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.