महाराष्ट्र

maharashtra

Akshay kumar and Rohit shetty : अक्षय कुमार दिसणार रोहित शेट्टीच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात...

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 5:24 PM IST

Akshay kumar and Rohit shetty : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच त्याच्या 'ओमजी 2'च्या यशाचा आनंद घेत आहे. दरम्यान आता त्याच्या बाबतीत एक बातमी समोर येत आहे. अक्षय हा रोहित शेट्टीच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं पेपरवर्क पूर्ण झालं आहे. शूटिंग केव्हा आणि कधी सुरू होणार याचं सध्या नियोजन सुरू आहे.

Akshay kumar and Rohit shetty
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी

मुंबई - Akshay kumar and Rohit shetty : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय हा शेवटी 'ओमजी 2'मध्ये दिसला होता. खिलाडी कुमारच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा व्यवसाय केला. अलीकडेच त्याच्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टिझर अक्षयच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या चित्रपटासाठी त्याचे चाहते खूप आतुर आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षयनं 2021मध्ये रोहित शेट्टीसोबत 'सूर्यवंशी' चित्रपटाद्वारे धमाल केल्यानंतर तो एका जबरदस्त चित्रपटामध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार प्रसिद्ध दिग्दर्शक मोहित सुरीसोबत अ‍ॅक्शन चित्रपट बनवणार आहे.

अक्षय कुमार दिसणार अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात :मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारनं रोहित शेट्टीच्या आगामी प्रोडक्शनला ग्रीन सिग्नल दिला असून या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी करणार आहे. 'रोहित, मोहित आणि अक्षय गेल्या काही दिवसांपासून या प्रोजेक्टवर चर्चा करत आहेत. हा एक उत्तम अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षयची भूमिका खूप वेगळी असणार आहे. अक्षयसोबत चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची कागदोपत्री प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. सध्या चित्रपटाच्या शूटिंगचं वेळापत्रक तयार केलं जात आहे. पुढील वर्षात केव्हाही या चित्रपटाची शुटिंग सुरू होऊ शकते, असं बोललं जात आहे.

चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू : या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अजय देवगण देखील अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. याआधी ही जोडी 'सूर्यवंशी'मध्येही अ‍ॅक्शन करताना दिसली होती. मोहित सुरी या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं समजत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. हा चित्रपट 2024 मध्ये फ्लोरवर जाईल. दरम्यान आता रोहित शेट्टी मुंबईतील एका स्टुडिओमध्ये 'सिंघम अगेन'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अजय देवगण असणार आहे. याशिवाय 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे कलाकार देखील झळकतील. या चित्रपटात जॅकी श्रॉफसोबत अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे.

हेही वाचा :

  1. Anurag Kashyap on Kangana : अनुराग कश्यप म्हणतो कंगना रणौत 'उत्कृष्ट अभिनेत्री' असली तरी तिला सामोरं जाणं 'खूप अवघडंय'
  2. Poonam pandey: पूनम पांडेच्या घराला लागली आग ; मोलकरणीनं वाचविलं पाळीव कुत्र्याचे प्राण...
  3. Jab we met sequel: 'जब वी मेट' चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

ABOUT THE AUTHOR

...view details