महाराष्ट्र

maharashtra

69th National Film Awards : चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली फोटोसाठी पोज

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 12:20 PM IST

69th National Film Awards : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यानंतर सर्व विजेत्यांसोबत राष्ट्रपतींनी फोटोसाठी पोज दिली.

69th National Film Awards
69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मुंबई -69th National Film Awards : 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटसृष्टीतील कलाकार विजेत्यांना प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवलं. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींसोबत सर्व स्टार्सनं फोटो सेशन केलं. आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अभिनेता आर माधवन दिग्दर्शित 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' चित्रपटानं सर्वोच्च सन्मान पटकावला. तसेच एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटानं या कार्यक्रमात सहा पुरस्कार पटकावले.

69th National Film Awards

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आले पुरस्कार : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनाही दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी संवाद साधला. दरम्यान आता या कार्यक्रमामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासह सर्व विजेत्यांचे सामूहिक फोटो यावेळी काढण्यात आले. यावेळी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील फोटोसाठी पोज दिली आहे. साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि क्रिती सेनॉन यांनी देखील खूप सेल्फी घेतल्या आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्यांच्यावर अभिनंदाचा वर्षाव करत आहेत.

69th National Film Awards

वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केले सन्मानित : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे जो दरवर्षी देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी जाहीर केला जातो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या मते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा उद्देश 'सौंदर्य आणि तांत्रिक उत्कृष्टता आणि सामाजिक प्रासंगिकतेच्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे' आहे. हा पुरस्कार सर्व चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी खूप महत्वाचा असतो.

हेही वाचा :

  1. 69th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते आलिया भट्ट, क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुनचे फोटो झाले व्हायरल...
  2. Kriti Sanon National Award : क्रिती सेनॉननं आई वडिलांसोबत आनंद साजरा केला राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद
  3. National Film Awards Ceremony २०२३ : 'दादासाहेब फाळके पुरस्कार' स्वीकारताना वहिदा रहमान भावूक

ABOUT THE AUTHOR

...view details