ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Spread) कमी करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार मास्क आणि लसीकरणाची सक्ती (Mask and Vaccination Compulsory) करत असताना, दुसरीकडे व्यापारी वर्ग मात्र सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात (Traders oppose Restrictions) आहे. आम्ही मास्क लावणारच नाही अशी अजब भुमिका ठाण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ठाण्यातील व्यापाऱ्यांनी मार्केट परिसरात सरकारविरोधात मोर्चा काढला. सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या कोरोनासंबंधी नियमांचा विरोध केला.
कुत्रा ,मांजरसारखे प्राणी विना मास्क निरोगी राहू शकतात तर या पृथ्वीवरचा बुद्धिमान प्राणी मात्र जगण्यासाठी मास्क लावतोय ही शोकांतिका असल्याचे अजब वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केला. सरकारने अशीच सक्ती केली तर आम्ही न्यायालयात जाऊन सरकारचा विरोध करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे -