महाराष्ट्र

maharashtra

14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करा; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

By

Published : Feb 12, 2022, 6:29 AM IST

भंडार्ली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासंबंधी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष समिती समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यासाठी गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

ठाणे - ठाणे महापालिकेच्यावतीने भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत असून या प्रकल्पांचा स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी महापालिकेच्यावतीने घेणार आहे. तरी सर्व स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भंडार्ली येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासंबंधी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्ष समिती समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. या 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यासाठी गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे त्याचेही कायदेशीर आणि तांत्रिक अभ्यास करून कारवाई करण्याचे आश्वासन या बैठकीत गावकऱ्यांना दिले आहेत.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होणार असून भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मौजे भंडार्ली येथील अंदाजे १० एकर जागा इतकी खाजगी जागा तात्पुरती भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या भंडार्ली येथील जागेवर कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, दुर्गंधी येणार नाही याची सर्वोतोपरी काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे कोणताही विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडार्ली संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व स्थानिक नागरिकांना केले आहे.

अनेक वर्ष रखडलेली काम होणार

भंडार्ली प्रकल्पांमुळे या गावांमधील नागरिकांनी विकास कामे करून घेण्याची संधी उपलब्ध झाली असून या परिसरातील रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा तसेच इतर अत्यावश्यक कामे देखील मार्गी लावण्याचा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या परिसरातील १४ गावांचा विकास करताना महापालिका, नगर विकास विभाग, महराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून ज्या-ज्या सुविधा देता येतील त्या देण्याच्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details