महाराष्ट्र

maharashtra

Municipal Cleaning Employee killing: महापालिकेच्या सफाई महिला कर्मचाऱ्याची धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या

By

Published : Oct 1, 2022, 6:39 PM IST

Municipal Cleaning Employee killing

भिवंडी-निजामपूर महापालिकेत (Bhiwandi Nizampur Municipal Corporation Female Employee Murder) सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची राहत्या घराचं अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या (Woman Killed with a Knife) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील (Bhiwandi Female Murder) कणेरी परिसरात घडली आहे. Thane Crime

ठाणे : भिवंडी-निजामपूर महापालिकेत (Bhiwandi Nizampur Municipal Corporation Female Employee Murder) सफाई कर्मचारी असलेल्या महिलेची राहत्या घराचं अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या (Woman Killed with a Knife) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील (Bhiwandi Female Murder) कणेरी परिसरात घडली आहे. सविता शिवराम साळवे (वय ४५) असे निर्घृण हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. Thane Crime

रक्ताच्या थारोळ्यात आढळले महिलेचे शव- मृत महिला भिवंडीतील कणेरी परिसरात कुटूंबासह राहत होती. ती महापालिकेत सफाई कामगार असल्याने आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास कामावर गेली होती. काम आटपून सकाळी ११ वाजताच्या सुमारास घरी आली असता, हत्या करणारा आरोपी हा महिलेच्या घरातच दबा धरून लपून बसला होता. महिलेने घराचा दरवाजा उघडताच आत लपून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या शरीरावर व गाळ्यावर धारदार चाकूने वार केले व घटनास्थळावरून पळून गेला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हे पाहून शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी तिला उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हत्येचा गुन्हा दाखल- या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. असून पोलीस सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. तर आरोपीला अटक केल्या नंतरच हि हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली आहे याची माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details