महाराष्ट्र

maharashtra

Kalwa Police Arrested two Accused : फेरीवाल्यांच्या वेशातील सराईत गुन्हेगारांनी केली घरफोडी, दोघे अटकेत

By

Published : Mar 2, 2022, 3:54 PM IST

दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक केली ( Kalwa Police Arrested two Accused ) आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 12 तोळे वजनाचे 6 लाखांचे सोन्याचे ऐवज हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते. दोघेही आरोपी हे परप्रांतिय असून एक जण कर्नाटक येथील आहे तर दुसरा तामिळनाडू येथील रहिवासी आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे- फेरीवाला बनून सोसायट्यांमध्ये रेकी करुन दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना ठाण्यातील कळवा पोलिसांनी शिताफीने अटक केली ( Kalwa Police Arrested two Accused )आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 12 तोळे वजनाचे 6 लाखांचे सोन्याचे ऐवज हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला. त्यांच्या विरोधात यापूर्वीह अनेक शहरांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल ( Robbery Case ) आहेत. दोघेही आरोपी हे परप्रांतिय असून एक जण कर्नाटक येथील आहे तर दुसरा तामिळनाडू येथील रहिवासी आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

याबाबत कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील कळवा पोलीस ( Kalwa Police ) ठाण्याच्या हद्दीतील मनीषा नगर परिसरात राहणाऱ्या स्मिता मालवणकर या गृहिणी घरातून कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्यावर पाळत ठेवून बसलेल्या आरोपींनी दिवसाढवळ्या घराचे टाळे तोडून फक्त 20 मिनिटांमध्ये घरातील 6 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सुमारे 12 तोळे सोने व रोकड, असा ऐवज लंपास केला. स्मिता या घरी परतल्यानंतर घराचे टाळे तुटून दरवाजा उघडा असून घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ कळवा पोलीस ( Kalwa Police ) ठाण्यात धाव घेत. अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी घटनेची सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत त्या आरोपींचा शोध घेतला. ते आरोपी हे बदलापूर येथील वांगणी परिसरात राहत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा या आरोपींचा पाठलाग केला असता ते नालासोपारा येथे लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेत मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हे दोघेही आरोपी हे मुळचे कर्नाटक आणि तामिळनाडू येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. शेखर नटराज नायर आणि देवेंद्र गणेश शेट्टी, असे या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

आरोपी सराईत गुन्हेगार -हे दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात ठाण्यातील एमएफसी, बदलापूर, मुंबईतील कांदिवली, पालघर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींची सहा महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटका होऊन बाहेर आले होते. त्यानंतर या दोघांनी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा केला आहे. या दोन्ही आरोपींसोबत त्यांची एक सहकारी महिला अद्याप फरार आहे. तिचा शोध कळवा पोलीस करत आहेत.

हेही वाचा -Crime News : वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत दागिन्यांची लूट

ABOUT THE AUTHOR

...view details