महाराष्ट्र

maharashtra

Youth Beating Video Viral Thane : मुलं पळविण्याच्या संशयातून कामाच्या शोधात असलेल्या तरुणाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By

Published : Oct 2, 2022, 4:39 PM IST

Youth Beating Video Viral Thane
Youth Beating Video Viral Thane ()

कामाच्या शोधात गावात भटकंती करणाऱ्या एका तरुणाला (Job seeking youth brutally beaten) पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मुलं पळविण्याच्या संशयातून (child abduction suspicion beating) बेदम मारहाण (beaten on suspicion of child abduction) केल्याची घटना व्हायरल व्हिडिओमुळे (Youth beaten video viral Thane) समोर आली आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील (hiwandi youth beating) परिवली गावात घडला आहे. शंकर नागराव गुंडगुडे (वय २८) असे बेदम मारहाण झालेल्या बेरोजगार तरुणाचे नाव आहे. (Parivali village youth beating)

ठाणे :कामाच्या शोधात गावात भटकंती करणाऱ्या एका तरुणाला (Job seeking youth brutally beaten) पाच ते सहा जणांच्या टोळक्याने मुलं पळविण्याच्या संशयातून (child abduction suspicion beating) बेदम मारहाण (beaten on suspicion of child abduction) केल्याची घटना व्हायरल व्हिडिओमुळे (Youth beaten video viral Thane) समोर आली आहे. हा प्रकार भिवंडी तालुक्यातील (hiwandi youth beating) परिवली गावात घडला आहे. शंकर नागराव गुंडगुडे (वय २८) असे बेदम मारहाण झालेल्या बेरोजगार तरुणाचे नाव आहे. (Parivali village youth beating)

खिशात पैसा नाही, पोटात अन्न नाही; वरून टोळक्याचा मार -गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह ठाणे जिह्यात सोशल मीडियावर मुलं चोरी केली जात असल्याचे व्हिडिओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गावा-गावात मुलं पळविण्याऱ्या टोळीची चर्चा सुरू असतानाच, असाच प्रकार भिवंडी तालुक्यातील परिवली गावात दोन दिवसांपूर्वी घडला आहे. शंकर हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली गावाचा रहिवाशी आहे. गावाकडे काम नसल्याने तो गेल्या काही दिवसापासून कामाच्या शोधात भिवंडी तालुक्यात आला होता. मात्र त्याला बरेच दिवस काम मिळत नसल्याने तो कामाच्या शोधात गावागावात पायपीट करून भटकंती करत परिवली गावात पोहचला होता; मात्र खिशात पैसे नसल्याने त्याला पोटभर अन्नही मिळत नव्हतं. अशाच अवस्थेत दोन दिवसांपूर्वी परिवली गावातील काही तरुणांनी त्याला मुलं पळविणारा असल्याचे समजून बेदम मारहाण करून एका झाडाला बांधून ठेवले. यानंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील शेलार चौकीतील पोलीस कर्मचाऱ्याला या घटनेची माहिती देण्यात आली.


तरुणाला मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी -माहिती मिळताच पोलीस नाईक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाकडे चौकशी केली असता, तो मजुरीच्या शोधात आल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नावाची नोंद करून त्याला सोडून देण्यात आले. मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांनी पुरेशी खातरजमा न करताच शंकरला बेदम मारहाण केल्याने नेटकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तरुणाला मारहाण करणाऱ्यां विरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details