महाराष्ट्र

maharashtra

Ulhasnagar : इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच ; ६० हून अधिक बळी, ठोस उपाययोजना नाही

By

Published : Sep 27, 2022, 5:31 PM IST

Building collapse session continues in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये इमारती कोसळण्याचे सत्र ()

उल्हासनगर महापालिका हद्दीत धोकादायक इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. उल्हासनगर ५ नंबर परिसरातील मानस टॉवर इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील एका रूमचा स्लॅब तळमजल्यापर्यत कोसळून चार जणांचा मृत्यू (Building collapse session continues in Ulhasnagar) झाला.

ठाणे :उल्हासनगर महापालिका हद्दीत धोकादायक इमारती कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. उल्हासनगर ५ नंबर परिसरातील मानस टॉवर इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील एका रूमचा स्लॅब तळमजल्यापर्यत कोसळून चार जणांचा मृत्यू (Building collapse session continues in Ulhasnagar) झाला. तर तिघे गंभीर जखमी झाल्याचे कालच समोर आले आहे. तर उल्हानसागर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून इमारत रिकामी करण्यात आली आहे. या दुर्घटनेत सागर ओचानी (१९), रेणू धनवानी (५५) धोलानदास धनवानी (५८) आणि प्रिया धनवानी (२४) अशी मृतांची नावे असून यामध्ये धनवानी कुटुंबातील तिघांचा समावेश असून पती पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबवित नसल्याने, अश्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केला (Building collapse session no concrete measures) आहे.

६० पेक्षा जास्त जणांचा बळी -उल्हासनगर शहरात इमारती स्लॅब, गॅलरी पडण्याचे सत्र सुरू असून धोकादायक व जुन्या इमारतींमधील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. इमारत कोसळण्याचे सत्र २५ वर्षांपासून सुरु आहे. सर्वात पहिली इमारत सोना मार्केट परीसरात असलेली इमारत कोसळून ९ रहिवाशांच्या मृत्यू झाला होता. तेव्हापासून म्हणजे २० वर्षांपासून आजतगायत ५० च्या जवळपास इमारत व इमारतीचे स्लॅब कोसळून ६० पेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यातच पुन्हा गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ भागात पाच मजली मानस टॉवर इमारतीमधील एका रूमचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली होती. या इमारतीमध्ये एकूण ३० फ्लॅट असून ही इमारत २५ वर्षापूर्वी उभारण्यात आली होती. तर उल्हासनगर महापालिकेनं या इमारतीच्या रहिवाशांना दोन वेळा इमारत धोकादायक असल्याने नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिका प्रशासनाने यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या इमारतीतील बहुतांश रहिवाशी राहत नव्हते. मात्र काही रहिवाशी जीव मुठीत घेऊन लपून छपून राहत असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी (Building collapse session victims) दिली.


बहुल्यावर चढण्याआधीच काळाचा घाला -या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये २४ वर्षीय प्रिया धनवानी (२४) हिचा साखरपुडा काही दिवसापूर्वीच होऊन तिच्या विवाहाची तारीख येणाऱ्या डिसेंबर महिन्यात निश्चित झाली होती. मात्र बहुल्यावर चढण्याआधीच तिच्यावर काळाने घाला घातला. शिवाय या दुर्घटनेत तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. सागर नावाच्या तरुणाची पिठाची गिरणी याच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या तळमजल्यावर असल्याने त्याचाही या दुर्घटनेत बळी (Building collapse) गेला.

उल्हासनगरमध्ये इमारती कोसळण्याचे सत्र

स्लॅब कोसळून ४२ जणांचे बळी -उदयोग नगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात १९९२ ते ९५ दरम्यान रेतीवर बंदी असताना दगडाचा बारीक चुरा व वालवा रेतीपासून असंख्य इमारती उभारण्यात आल्या. त्याच इमारती नागरिकांच्या जीवावर उठल्याचे उघड होत आहे. निकृष्ट बांधकाम झालेल्या इमारतींचे स्लॅब कोसळून दरवर्षी अनेकांचा बळी जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून केवळ गेल्या १२ वर्षात ३४ इमारतींचे स्लॅब कोसळून ४२ जणांचे बळी गेले आहे. तर हजारो नागरिक बेघर झाले आहेत. धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. इमारत कोसळली की, राजकीय नेते, महापालिका व सरकार सहानुभूती दाखविते. त्यानंतर धोकादायक इमारतीबाबत काही एक निर्णय घेतला जात नसल्याची टीका होत (Building collapse) आहे.


धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्ह -उल्हासनगर महापालिकेने गेल्या पावसाळ्यात १४७ इमारती धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्यापैकी २३ इमारती अतिधोकादायक आहेत. २३ पैकी १८ अतिधोकादायक इमारती रिकाम्या असून, अन्य इमारतींमधील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. धोकादायक इमारतींच्या यादीव्यतिरिक्त इतर इमारतींचे स्लॅब कोसळून नागरिकांचे बळी जात असल्याने, धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. अखेर महापालिकेने १० वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन इमारतींना नोटीस दिल्या आहेत. तर सरकारने खास शहरासाठी (Ulhasnagar) काढलेल्या अध्यादेशाअंतर्गत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते का ? याबाबतचा प्रश्न जैसे थे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.


पंधरा महिने उलटूनही अहवाल नाही -शहरातील धोकादायक व अनाधिकृत इमारती नियमित करण्यासाठी राज्यपालाच्या आदेशाने राज्य शासनाने एक कमिटी स्थापन करून, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. हा आदेश तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र पंधरा महिने उलटूनही कमिटीने अहवाल अद्याप दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शासनाने शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी अवैध व जुन्या इमारतींबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.


दुर्घटनेनंतर शिंदे गटाचे आमदार प्रश्न मार्गी लावणार -उल्हासनगर महानगरपालिकेने धोकादायक व अनधिकृत घोषित केलेल्या इमारतीमध्ये नागरिकांनी राहू नये, असे आवाहनही आमदार डॉ. किणीकर यांनी गेल्या वर्षी केले होते. तसेच उल्हासनगर शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लागण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकही झाली होती. त्यानुसार समिती नेमण्यात आली होती. विशेष म्हणजे समिती नेमून पंधरा महिने होत आले. मात्र धोकादायक व अनधिकृत इमारतीचा हा प्रश्न मार्गी कधी लागणार असा प्रश्न कालच्या दुर्घटनेनंतर पुन्हा उपस्थित झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details