महाराष्ट्र

maharashtra

World Press Freedom Day 2022 - जागतिक पातळीवर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा घसरता क्रम

By

Published : May 3, 2022, 4:09 PM IST

Updated : May 3, 2022, 7:56 PM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्व प्रेस स्वतंत्रता सूची किंवा यादीमध्ये भारताचा घसरता क्रमांक आहे. 188 देशांच्या यादीत भारताचा 142 वा क्रमांक लागतो. नॉर्वे,स्वीडन हे छोटे देश प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहेत. हा अहवाल दरवर्षी रिपोर्ट्स विदाऊट बोर्डर्स द्वारे प्रकाशीत केला जातो.

World Press Freedom Day 2022
World Press Freedom Day 2022

सोलापूर -भारतात नेहमी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या विषयी चर्चा होत राहते. दरवर्षी 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना निमित्त वृत्तपत्र स्वातंत्र्यवर चर्चा होते. आज जगातील बातम्या देण्यासाठी प्रेस हे सर्वोत्तम माध्यम आहे. जागतिक पातळीवर माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रच्या महासभेत 3 मे हा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी 3 मे रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिलेरमो कानो वल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार देखील दिला जातो. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा आजही घसरता क्रम आहे.188 देशांच्या यादीत भारत 142 व्या स्थानावर आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केली. भारत देशात सत्ताधारी पक्षाकडून नेहमी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गधा आणली जाते किंवा त्यांची मुस्कटदाबी केली जाते.

जागतिक पातळीवर वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा घसरता क्रम
का साजरा केला जातो प्रेस स्वातंत्र्य दिवस -जगभरातील अनेक देश पत्रकार आणि माध्यम संस्थांवर अन्याय किंवा अत्याचार करतात. माध्यम संस्था किंवा पत्रकारांनी सरकारच्या इच्छेप्रमाणे वागले नाही तर त्यांचा विविध प्रकारे छळ केला जातो. त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी त्यांच्यावर दंड आकारणे, प्राप्तिकराचे छापे घालणे, जाहिराती बंद करणे इत्यादी विविध डावपेच अवलंबले जातात. कधीकधी तर माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्यांना मारहाण देखील केली जाते. यासर्व बाबी लक्षात घेऊन जगभरात पत्रकार आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस 3 मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने पत्रकारांचे स्वातंत्र्य कसे हिरावले जात आहेत हे सांगितले जाते.प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताचा घसरता क्रम - आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्व प्रेस स्वतंत्रता सूची किंवा यादीमध्ये भारताचा घसरता क्रमांक आहे. 188 देशांच्या यादीत भारताचा 142 वा क्रमांक लागतो. नॉर्वे,स्वीडन हे छोटे देश प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहेत. हा अहवाल दरवर्षी रिपोर्ट्स विदाऊट बोर्डर्स द्वारे प्रकाशीत केला जातो.उरग्वे देशात यंदाचा प्रेस स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे-यंदाच्या वर्षी 2 ते 5 मे दरम्यान उरग्वे देशात जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. युनेस्कोद्वारे आयोजित ही जागतिक परिषद पार पडत आहे. डिजिटल घेराबंदी अंतर्गत पत्रकारिता या घोषवाक्य नुसार जागतिक पत्रकार स्वातंत्र्य किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन पार होत आहे. या थीम अंतर्गत डिजिटल युगाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांचे संरक्षण, माहितीचा प्रवेश आणि गोपनीयतेवर होणारा परिणाम यावर चर्चा केली जाणार आहे.
Last Updated :May 3, 2022, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details