महाराष्ट्र

maharashtra

Supriya Sule Press Conference : बीजेपी म्हणजे भारतीय जनता लॉन्ड्री ; चंद्रशेखर बावनकुळेंना सुप्रिया सुळेंचे उत्तर

By

Published : Sep 30, 2022, 5:13 PM IST

Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे ()

सोलापूर-बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर आल्या (Supriya Sule Press Conference in Solapur) होत्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री असे (Supriya Sule answered Chandrashekhar Bawankule) संबोधले.

सोलापूर :सोलापूर-बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीला 'भारतीय जनता लॉन्ड्री' असे संबोधले. याचं उदाहरण देताना सुळेंनी सांगलीच्या खासदारांनी सांगितले की - बीजेपीत गेल्यापासून झोप चांगली लागते. इतके दिवस मी याला पक्ष समजत होते, पण ही तर भारतीय जनता लॉन्ड्री निघाली, अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule answered Chandrashekhar Bawankule) उडविली. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना भाजप शिंदे गट राज्यात 45+जागा जिंकेल, असे वक्तव्य केले होते. त्यात बारामती पाहिले क्रमांकाचे असेल, त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं (Supriya Sule Press Conference in Solapur) आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

बीजेपी नव्हे तर भारतीय जनता लॉन्ड्री -भारतीय जनता पार्टीला आजतागायत मी पक्ष समजत होते, पण हे तर भारतीय जनता लॉन्ड्री आहे. अशी खिल्ली सुप्रिया सुळेंनी उडविली आहे. लॉन्ड्रीबाबत खुलासा करताना सुळेंनी अधिक विश्लेषणत्मक माहिती दिली. सांगली येथील खासदार मी आता बीजेपीमध्ये आहे, मला आता ईडीची भीती वाटत नाही. मला चांगली झोप लागते, असे भाजप खासदारांचं वक्तव्य आहे. मी आजतागायत बीजेपीला पक्ष समजत होते. मात्र हे भारतीय जनता लॉन्ड्री आहे, असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule answered in a press conference) लगावला.

आम्ही पन्नास खोकेंची कामे केली -गेल्या तीन महिन्यांपासून 50 खोके समदं ओके, असा ऐकायला मिळत आहे. पण आम्ही आमदार दत्ता भरणे यांच्यासोबत 50 खोकेंची विकास कामे केली. असे खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे गटातील सर्व आमदारांना लगावला आहे. नवीन ईडीचं सरकार आल्यापासून रोज काही तरी नवीन घडतंय.


पीएफआय बंदीबाबत केंद्र सरकारने खुलासा करावा -पीएफआय या संघटनेवर बंदी आली आहे. देशभरात संघटनेच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकऱ्यांची धरपकड सुरू आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला खुलासा मागितला आहे. गृहमंत्रालय किंवा केंद्र सरकारने बंदी कोणत्या कायद्यानुसार आणली याचा स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details