महाराष्ट्र

maharashtra

Amravati love jihad नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार

By

Published : Sep 9, 2022, 1:18 PM IST

Updated : Sep 9, 2022, 1:59 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन नवनीत राणा त्यांच्या टेबलवर मोबाईल आपटतात. पोलीस अधिकाऱ्यांसोबत उद्धट भाषेत अरेरावीची भाषा वापरतात. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी त्यांनी ( Solapur retired police officers association  ) मागणी केली.

भाऊसाहेब आंधळकर
भाऊसाहेब आंधळकर

सोलापूरलव्ह जिहाद घडल्याचा दावा करणाऱ्या खासदार नवनीत राणा या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले भाऊसाहेब आंधळकर ( Bhausaheb Andhalkar on Navneena Rana ) यांनी खासदार नवनीत राणा विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. अन्यथा निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.

भाऊसाहेब आंधळकर हे मुंबई, पुणेसह आदी शहरात पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन ही संघटना नवनीत राणा विरोधात महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार असा सज्जड इशारा यावेळी दिला. अमरावती प्रकरणाला खासदार नवनीत राणा यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या टेबलवर मोबाईल आपटतात. पोलीस अधिकाऱ्यांसोबत उद्धट भाषेत अरेरावीची भाषा वापरतात. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी त्यांनी ( Solapur retired police officers association ) मागणी केली. यापुढे कोणत्याही राजकीय पुढारी अधिकाऱ्यांसोबत अशी वर्तवणूक करणार नाही, अशी अद्दल घडवा अशी तिखट प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यक्त केली.

निवृत्त पोलीस अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार


अमरावतीत घडल्या नाट्यमय घडामोडी-अमरावतीत ( Amravati love jihad case ) एका हिंदू मुलीला आंतरधर्मीय विवाह करण्यास लावले आणि तिला डांबून ठेवले. हा लव्ह जिहाद आहे असा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मोठा गोंधळ केला होता. राज्यभर हा व्हिडीओ पाहून अनेक जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. लव्ह जिहाद हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. पण अमरावती, पुणे व सातारा पोलिसांनी संबंधित मुलीचा शोध घेत सत्य महिती समोर आणली. त्या मुलीचा आंतरधर्मीय विवाह झाला नव्हता. तर कौटुंबिक वादातून ती संबंधित मुलगी कंटाळून घरातून निघून गेली होती, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.


नवनीत राणावर अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा अन्यथा राज्यभर आंदोलनसेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत तीव्र शब्दांत खासदार नवनीत राणा यांचा निषेध केला आहे. हे खासदार , आमदार शासनाच्या कोणत्याही कार्यालयात जातात. अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करतात हे अत्यंत निंदनीय आहे. नवनीत राणा विरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करा. त्यावर कडक कारवाई करा, अन्यथा राज्यभर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. लोकप्रतिनिधीचा असा दुरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केली.

Last Updated : Sep 9, 2022, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details