महाराष्ट्र

maharashtra

Environmental Protection Bicycle Rally : पर्यावरण बचावाचा संदेश देत सोलापुरात भव्य सायकल रॅली

By

Published : Jun 5, 2022, 3:48 PM IST

Environmental Rescue Message Rally
पर्यावरण बचाव संदेश रॅली ()

सोलापूरमध्ये (In Solapur) आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (Rally on occasion of World Environment Day In Solapur) शासकीय आयटीआय (Government ITI Solapur) व रोटरी क्लब सोलापूर (Rotary Club Solapur) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सायकल रॅलीत पर्यावरण बचाव, "झाडे लावा, झाडे जगवा" ("Plant Trees, keep Trees Alive") असा नाराही देण्यात आला. ही रॅली शहरात असलेल्या मुख्य चौकात काढण्यात आली होती. या रॅलीत आयटीआयचे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. (Large Number of Students Participated)

सोलापूर : आज सोलापूरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य सायकल रॅली (Environmental Rescue Message Rally) काढण्यात आली. शासकीय आयटीआय व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी सायकल रॅलीत पर्यावरण बचाव, "झाडे लावा, झाडे जगवा" असा नारा देण्यात आला. ही सायकल रॅली सोलापूर शहरात असलेल्या मुख्य चौकात काढण्यात आली होती. या रॅलीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)चे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली

कार्बन डायॉक्साईड कमी करण्यासाठी प्रयत्न करावे : जगातील जवळपास 100 देशांत जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. यातील मुख्य उद्देश हा आहे की, जगातील प्रत्येक व्यक्तीत पर्यावरण बचावासाठी जागरूकता निर्माण व्हावी. पर्यावरणातील बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील वाढते कार्बन डायऑक्साईड याबाबत नागरिक जागृत होणे आवश्यक आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.

पर्यावरण बचाव सायकल रॅली

आयटीआय व रोटरी क्लब यांचा पर्यावरण बचावाचा संयुक्त उपक्रम :सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या आयटीआय व रोटरी क्लब सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 किलोमीटर भव्य सायकल काढण्यात आली. या सायकल रॅलीत विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य चौकात पर्यावरण बचावच्या घोषणा दिल्या. "पेट्रोल किंवा डिझेलच्या इंधनाचा वापर कमी करा" असादेखील नारा दिला. या रॅलीनंतर शहरातील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

रॅलीसोबत वृक्षारोपण कार्यक्रम : या रॅलीसोबत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारची जवळपास 200 झाडं लावण्यात आली. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य मनोज बीडकर, संजय मल्लाव, बसवराज सारंगमठ, शिरीष शेळके, विजय भांगे, अरुण सरडे, प्रवीण केंदळे, निर्मला म्हेत्रे, अजयकुमार कोरे, नितीन शिंदे, रोटरी क्लबचे कौशिक शहा, निकिताबेन पटेल, शांता येळमकर, शिवाजी उपरे,

हेही वाचा :World Environment Day : वीज उपकेंद्रात यंत्रचालकांनी फुलवली वनराई

ABOUT THE AUTHOR

...view details