महाराष्ट्र

maharashtra

Diwali 2021 : प्लास्टिकचा वापर टाळत कागदी आकाशकंदील बाजारात

By

Published : Nov 3, 2021, 8:52 PM IST

फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, परंतु जीवितहानी देखील होण्याचा धोका आहे. इको फ्रेंडली दिवाळीला प्राधान्य देऊ या, या अपेक्षेने सोलापुरातील पर्यावरणप्रेमींनी कागदी आकाशकंदील विक्री आणि खरेदीवर भर दिला आहे.

diwali
कागदी आकाशकंदील

सोलापूर - देशात पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्व असून, ते साजरे करताना पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे प्रयत्न सोलापूर जिल्हा प्रशासन करत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे दोन महिने एकही वाहन धावले नव्हते. त्यामुळे शहराचे वातावरण प्रदूषणमुक्त झाले होते. पण जसजसे कोरोनाची तीव्रता कमी होत गेली, पुन्हा प्रदूषण वाढत गेले. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण तर होतच आहे, तसेच वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूरच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने फटाक्यांच्या दुकानांवरसुद्धा कारवाई केली आहे. पण हौशी नागरिकांना कोण समजावून सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

'ई टीव्ही भारत'ला अग्निशामक दल अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, परंतु जीवितहानी देखील होण्याचा धोका आहे. इको फ्रेंडली दिवाळीला प्राधान्य देऊ या, या अपेक्षेने सोलापुरातील पर्यावरणप्रेमींनी कागदी आकाशकंदील विक्री आणि खरेदीवर भर दिला आहे.

कागदी आकाशकंदील

हेही वाचा -बेघरांना दिवाळीचे साहित्य भेट; सांगली पोलिसांनी स्तुत्य उपक्रम

  • प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी कागदी आणि बांबूचे आकाशकंदील -

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली आहे. प्लास्टिकमुळे भयंकर असे प्रदूषण होत आहे. राज्य शासन प्लास्टिक विक्रीवर विविध निर्बंध आणून प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर भर देत आहे. दिवाळीमध्ये विविध प्रकारचे आकाशकंदील बाहेर देशातून आयात केले जातात किंवा प्लास्टिकचा भरपूर वापर असलेल्या वस्तूपासून आकाशकंदील तयार केले जात आहेत. पण पर्यावरण प्रेमींनी कागद आणि बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील खरेदी करा आणि पर्यावरणाचा नुकसान होण्यास मदत करा, अशी जनजागृती केली आहे. सोलापुरातील बाजारपेठांमध्ये या पर्यावरण प्रेमींनी पर्यावरणपूरक आकाशकंदील विक्रीचे दुकाने थाटली आहेत.

कागदी आकाशकंदील
  • फटाक्यांमुळे जीवितास नुकसान-

दिवाळीत फटाक्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. पण हे फटाके जीवितास धोका देखील ठरू शकतात. सोलापूर जिल्ह्यातील अग्निशामक दल अधिकारी केदार आवटे यांनी शहर आणि जिल्हावासीयांना आवाहन केले आहे की,फटाके मुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहन केले आहे. वातावरणातील ध्वनी आणि वायू प्रदूषण तर होतेच पण जीवितास धोका असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

कागदी आकाशकंदील

हेही वाचा -Eco Friendly Diwali : 'इको फ्रेंडली' दिवाळीचा 'लातूर ग्रीन वृक्ष टीम'चा संकल्प

ABOUT THE AUTHOR

...view details