महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधानांच्या तुघलकी निर्णयाने तरुण बेरोजगार, काँग्रेसने सोलापुरात पकोडे तळून केला मोदींचा वाढदिवस साजरा

By

Published : Sep 17, 2020, 7:07 PM IST

Updated : Sep 17, 2020, 7:14 PM IST

सोलापूर शहर काँग्रेस व एनएसयूआयकडून राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करत लॉलीपॉपचे वाटप केले. यावेळी पकोडे तळून नागरिकांना मोफत वाटप केले.

congress celebrates modis birthday by frying pakodas in solapur
पंतप्रधानांच्या तुघलकी निर्णयाने तरुण बेरोजगार

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर शहर काँग्रेस व एनएसयूआयकडून राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करत लॉलीपॉपचे वाटप केले. यावेळी पकोडे तळून नागरिकांना मोफत वाटप केले. नरेंद्र मोदींच्या तुघलकी निर्णयाने अनेक जणांचे रोजगार गेले आहेत, असा आरोप करत मोदींना तुघलक ही उपाधी देण्यात आली.

पंतप्रधानांच्या तुघलकी निर्णयाने तरुण बेरोजगार, काँग्रेसने सोलापुरात पकोडे तळून केला मोदींचा वाढदिवस साजरा

काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास लॉलीपॉप वाटप करण्यात आले. तुघलकी निर्णयामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विनोद भोसले, आंबदास करगुळे, सैफन शेख, सुभाष वाघमारे, किरण राठोड, अभिषेक गायकवाडसह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे एनएसयूआयकडून पकोडे तळून मोदींविरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी गणेश डोंगरे, शुभम माने, शिवराज बिराजदार, अजित पवार, सिद्धाराम सागरे, श्रीकांत वाडेकर, ज्ञानेश्वर देवकर, अजय जाधव, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Sep 17, 2020, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details