महाराष्ट्र

maharashtra

Wari 2022 : माऊलींच्या अश्वांची श्रीमंत दगडूशेठ गणपतीला सभामंडपातून मानवंदना

By

Published : Jun 20, 2022, 7:53 AM IST

संपादित छायाचित्र

माऊली, माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करत आरोग्यसंपन्न भारतासाठी बाप्पा आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

पुणे -माऊली, माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करत आरोग्यसंपन्न भारतासाठी बाप्पा आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सभामंडपातून मानवंदना

कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. दरवर्षी सुमारे 300 किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. कोविडपूर्वी अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. यंदा तिसऱ्या वर्षी गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात, असे यावेळी महादजी शितोळे म्हणाले. ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची सुरुवात चांगली झाली असून हरित वारी, स्वच्छता, आरोग्य तपासणी आणि वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा -Atrocity against Karuna Sharma : पुण्यात करुणा शर्माविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details