महाराष्ट्र

maharashtra

Welcome To 2022 : पुण्यात तळीरामांसाठी लागलय अनोखं बॅनर, पहा 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

By

Published : Dec 31, 2021, 4:44 PM IST

नव वर्षाच्या स्वागतासठी सर्वजण सज्ज आहेत. अतिशय उत्साहाने आपण सारेजण सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या वर्षाचे जोरदार स्वागत करत आहोत. (Welcome To 2022) मात्र, हे करताना काहीजणांना दारूच्या नशेत परिस्थितीचे भान राहत नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक सामाजिक संस्था प्रत्येक वर्षी 'दारू नको दूध प्या' असे संदेश घेवून दरवर्षी प्रबोधनाचे काम करतात. हा प्रयोग यावर्षीही करण्यात आला आहे.

पुण्यात तळीरामांसाठी लागलय अनोखं बॅनर
पुण्यात तळीरामांसाठी लागलय अनोखं बॅनर

पुणे - नव वर्षाच्या स्वागतासठी सर्वजण सज्ज आहेत. अतिशय उत्साहाने आपण सारेजण सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या वर्षाचे जोरदार स्वागत करत आहोत. मात्र, हे करताना काहीजणांना दारूच्या नशेत परिस्थितीचे भान राहत नाही. तळीराम हे आपल्या नशेतच अडकतात आणि इतरांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. (Welcome To 2022 In Pune) पुण्यात अनेक सामाजिक संस्था प्रत्येक वर्षी दारू नको दूध प्या असे संदेश घेवून दरवर्षी प्रबोधनाचे काम करतात. हा प्रयोग यावर्षीही करण्यात आला आहे.

'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

या बसा प्या पण दूध किंवा दारू हे तुम्ही ठरवा

पुण्यात एक अनोखं बॅनर लागलं आहे. या बॅनरवर चक्क तळीरामांना 'या बसा प्या.. पण, दूध किंवा दारू हे तुम्ही ठरवा' असं सांगतच हे दोन्ही पेय पिण्यासाठी चक्क एक मोठा तंबू मारून बसण्याची व्यवस्था देखील केली आहे. दरम्यान, पुण्यात कोथरूड परिसरात लागलेला हा बोर्ड सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. या बोर्डवर लिहिलेला 'या बसा प्या पण दूध किंवा दारू हे तुम्ही ठरवा' हा मजकूर सर्वांना कोड्यात पाडत आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते यांनी आढावा घेतला आहे.

हेही वाचा -भाजप काळात मोगलाई वाढली! 'त्या' मुलांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याने सामनातून प्रहार

ABOUT THE AUTHOR

...view details