महाराष्ट्र

maharashtra

Uddhav Thackeray : हृदयस्पर्शी! स्वतःच्या रक्ताने काढले उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट; कार्यकर्त्याने दिल्या अनोख्या शुभेच्छा

By

Published : Jul 28, 2022, 3:50 PM IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा काल वाढदिवस होता. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुःखाचे आणि राजकीय संकटाचे सावट वाढदिवसावर आहे. त्यातच पुण्यातील एका कार्यकर्त्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून वाढदिवसांची भेट दिलेली ( Uddhav Thackeray portrait drawing with blood ) आहे.

Uddhav Thackeray portrait drawing with blood
उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट

पुणे - नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते काय काय करतील त्याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पुण्यातीलच असा एक कार्यकर्त्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांना स्वतःच्या रक्ताने पोर्ट्रेट काढून वाढदिवसांची भेट दिलेली ( Uddhav Thackeray portrait drawing with blood ) आहे.

रक्ताने काढले उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट

रक्ताने बनवले उद्धव ठाकरेंचे चित्र - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे झालेल्या दुःखाचे आणि राजकीय संकटाचे सावत्या वाढदिवसावर आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की मला भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञापत्र द्या या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेचा यंदाचा वाढदिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. परंतु, असेच एक वेगळी संकल्पना राबवत आपल्या लाडक्या नेत्याला ते स्वतःच्या रक्ताने फोटो काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले नेते आपण किती कट्टर आहोत, हे इतरापेक्षा वेगळे करून दाखवला आहे.

मातोश्रीवर जाऊन दिले चित्र भेट - धनकवडी बालाजी नगरमधील कट्टर शिवसैनिक सारंग धारणे या तरुणांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रक्ताने पोर्ट्रेट काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशा पद्धतीने शुभेच्छा दिल्यानंतर त्याची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी सारंग धारणे यांचाही वाढदिवस आहे. त्याचेही बॅनर धनकवडी बालाजी नगर भागात लागली होते. परंतु, आपल्या नेत्याप्रती आपण किती कट्टर आहोत हे दाखवण्यासाठी त्याने उद्धव ठाकरेंचे आपल्या स्वतःच्या रक्ताने फोटो काढून त्यांना भेट म्हणून मातोश्रीवर दिला आहे.

हेही वाचा - Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details