महाराष्ट्र

maharashtra

Pune Police : बनावट पदव्या देऊन विद्यार्थ्यांना गंडा घालणाऱ्या भामट्याला पुण्यात अटक

By

Published : Feb 27, 2022, 1:22 PM IST

भामट्याला पुण्यात अटक

स्वप्नील ठाकरे पाटील हा बुलडाण्यातील खामगाव येथील श्री छत्रपती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष तर छत्रपती प्रतिष्ठान प्रमुख आहे. याबाबत MIT संस्थेचे डॉ. जयदीप जाधव यांनी प्रकरणी कोथरूड पोलीस तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरून स्वप्नील ठाकरे, महेश देशपांडे व माधव पाटील या तीन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पुणे - कानपुर येथील विद्यापीठाच्या नावाने पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील 292 विद्यार्थ्यांना एमबीएच्या बनावट पदव्या देऊन ५८ लाख रुपयांनी गंडविणाऱ्या स्वप्नील ठाकरे पाटील या भामट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या दोन साथीदारांना ही अटक केली आहे.

स्वप्नील ठाकरे पाटील हा बुलडाण्यातील खामगाव येथील श्री छत्रपती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष तर छत्रपती प्रतिष्ठान प्रमुख आहे. याबाबत MIT संस्थेचे डॉ. जयदीप जाधव यांनी प्रकरणी कोथरूड पोलीस तक्रार दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीवरून स्वप्नील ठाकरे, महेश देशपांडे व माधव पाटील या तीन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर प्रकरणात खामगाव परिसरातील स्वप्नील ठाकरे याचे इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहे. कोथरूड पोलीसांच पथक या दृष्टीने खामगावात चौकशीसाठी तळ ठोकून आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details