महाराष्ट्र

maharashtra

Pune Chandani Chowk Bridge Demolition: ६०० किलो स्फोटके, ६ सेकंदात पुण्यातील चांदणी चौकातला पूल होणार जमीनदोस्त

By

Published : Oct 1, 2022, 3:58 PM IST

Updated : Oct 1, 2022, 4:09 PM IST

Pune Chandani Chowk Bridge Demolition: पुण्यासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला चांदणी चौकाचा ब्रिज अखेर आज प्रशासनाकडून पाडण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. आज 10 वाजता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच रात्री 12 नंतर तब्बल 600 किलो स्फोटकांनी 6 सेकंदात चांदणी चौकातील हा जुना ब्रिज पाडण्यात येणार आहे.

Pune Chandani Chowk Bridge Demolition
Pune Chandani Chowk Bridge Demolition

पुणे: पुण्यासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला चांदणी चौकाचा ब्रिज अखेर आज प्रशासनाकडून पाडण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. आज 10 वाजता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच रात्री 12 नंतर तब्बल 600 किलो स्पोटकनी 6 सेकंदात चांदणी चौकातील हा जुना ब्रिज पाडण्यात येणार आहे.

असा पाडण्यात येणार चांदणी चौकातील पूल

गेल्या काही वर्षांपासून या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत होती, आणि त्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा मुंबईवरून साताऱ्याला जाणाऱ्या, साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या तसेच पुणे शहरात येणाऱ्या वाहनांना प्रचंड प्रमाणात सहन करावी लागत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde हे या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर प्रशासन महिनाभरामध्ये हा ब्रीज पाडण्याची तयारी केली. त्याचबरोबर वाहतूक मंत्री केंद्रीय नितीन गडकरीची सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली आणि आदेश दिले होते की लवकरात लवकर काम सुरू करा, आणि ती वाहतूक कोंडी सोडवा. आता ती तयारी पूर्ण झालेली आहे.

10 वाजता पुणे मुंबई हायवेवरली जी वाहतूक आहे. ती वाहतूक बंद करण्यात येईल. साताऱ्या केली वाहतूक बंद करण्यात येईल आणि जे वाहने पुणे मुंबई हायवे वरून वाहतूक करतात त्यांना आता पुणे शहरांमधून खेड शिवापुर टोल नाक्यावर निघावं लागेल आणि साताराकडून येणाऱ्या वाहनांना तळेगाव दाभाडेपर्यंत बाहेर निघावे लागेल. मुंबईला जावं लागेल, अशी व्यवस्था करण्यात आली. पुणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्त त्याचबरोबर येण्याच्या अशा सर्व यंत्रणा या ठिकाणी आजपासून कार्यरत होणार आहेत. त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत आणि सगळी वाहतूक व्यवस्थेची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Last Updated :Oct 1, 2022, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details