महाराष्ट्र

maharashtra

पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दर बदलले, पाहा नवीन दर

By

Published : Feb 1, 2022, 3:26 PM IST

पुणे रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी कपात करण्यात आली आहे. कोरोनाकाळात वाढलेली रुग्णसंख्या आणि संसर्ग रोखण्यासाठी प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी असावी यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दर 10 रुपयांवरुन 50 रुपये करण्यात आले होते. मात्र आता कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यामुळे हे दर पुन्हा जैसे थे करण्यात आले आहेत. नवे दर 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

Pune railway station
पुणे रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी कपात

पुणे- पुणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकीट (Pune Railway Station) आता पूर्ववत करण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाचा ( COVID-19 ) प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे स्टेशनवरची गर्दी टाळण्यासाठी पुणे स्टेशन प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये मोठी वाढ केली होती.

पुणे स्टेशनवर सतत रहदारी असते. या स्टेशनवरुन ये-जा करणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे गर्दीही खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यातच प्रवाशांची संख्याही वाढत असताना कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याचा धोका होता. यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरामध्ये मोठी वाढ केली होती. १० रुपयांना असणारे तिकीट कोरोनाकाळात ५० रुपयांना मिळत होते. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात येत आहे, त्याच अनुषंगाने प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये करण्यात आले आहे.

१ फेब्रुवारी २०२२ प्लॅटफॉर्म तिकीटांचे नवे दर लागू झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details